परभणी (Parbhani):- घरफोडी किंवा चोरी करण्याच्या उद्देशाने वस्तू सोबत घेऊन फिरणार्या एका संशयीताला नानलपेठ पोलिसांच्या पथकाने जनता मार्केट परिसरातून ताब्यात घेतले. संबंधितावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल(Filed a case) करण्यात आला आहे. ही कारवाई(action) २५ जुनच्या पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस अंमलदार निलेश कांबळे, पोशि. काळे हे दोघेजण गस्त घालत होते. यांना दुचाकीवरील एक इसम संशयीतरित्या फिरत असल्याचे दिसले. संबंधिताजवळ लोखंडी कटर(Cutter), चाकू (Knife), विविध आकाराचे पाने, असे साहित्य मिळून आले. चोरी, घरफोडी करण्याच्या उद्देशाने संशयीत फिरत होता. या प्रकरणी पोलीस अंमलदार निलेश कांबळे यांच्या फिर्यादीवरुन कृष्णा केदारनाथ जमदाडे याच्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात (Police stations) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह. सोडगीर करत आहेत.