लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास!
परभणी (Burglary) : परभणीच्या पाथरी तालुक्यातील उमरा येथे घरफोडी करत चोरट्यांनी 97 हजार 200 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच गावातील एकाच्या घरी चोरी (Theft) केली, तर दुसर्याच्या घरात कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 5 जूनच्या पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी अनोळखी चोरट्यांवर पाथरी पोलिस ठाण्यात (Pathri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल!
दयानंद कोल्हे यांनी तक्रार दिली आहे. नेहमीप्रमाणे फिर्यादी त्यांचे आई, वडील, भाऊ, भावजई हे घराच्या गेटला कुलूप लाऊन झोपी केले होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या आईला जाग आली. त्यांना घरात काही तरी वाजल्याचे वाटले. त्यांनी फिर्यादीच्या वडीलांना उठविले. घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, दरवाजा उघडला नाही. घरातील दरवाजे बाहेरुन बंद होते. यानंतर फिर्यादीच्या भावाने शेजारी फोन करुन दरवाजे उघडण्याचे सांगितले. घराची पाहणी केल्यावर त्यांना घरातील कपाट उघडे दिसले. कपाटातुन 97 हजार 200 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने (Gold Ornaments) चोरीला गेले होते. याच दरम्यान गावातील राजेभाऊ कोल्हे यांच्या घरी चोरी झाल्याचे तसेच, मदन कोल्हे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याचे पुढे आले. घटनेची माहिती पाथरी पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. तपास पो.ह. धस करत आहेत.
