मानोरा (Washim):- तालुक्यातील घोटी येथील शेत शिवारात नवीन बसविण्यात आलेले विद्युत रोहित्र अचानक आग (Fire)लागल्याने जळून खाक झाले. ही घटना १ जून रोजी घडली. यामध्ये विज वितरण कंपनीचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार,शेतकर्यांच्या मागणीनुसार कृषि पंपाच्या विद्युत पुरवठा(Power supply) करणेकरीता महावितरणकडून नवीनच विद्युत रोहित्र घोटी शिवारात बसविण्यात आले होते. शनिवारी सकाळच्या सुमारास अचानक विद्युत रोहित्राने पेट घेतला. त्यामध्ये रोहित्र जळून खाक झाले आहे. सास कंट्रोलचे अजय ढोक यांनी महावितरणचे अभियंतास भ्रमणध्वनीवरून(cell phone) माहिती दिली असता, विज वितरण(Electricity distribution) कंपनीकडून विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येऊन आग विझविण्यात आली. त्यानंतर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला.