गडेगाव डेपोजवळील खुटसावरी फाट्यावर ‘बर्निंग व्हॅन’
लाखनी/भंडारा (Burning van) : भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) लाखनी तालुका अंतर्गत येणार्या खुटसावरी फाट्यावर भंडार्याकडे रक्तपेढीच्या व्हॅनला अचानक आग लागली. आगीत व्हॅन जळून खाक झाली. सदर घटना रात्री १०.३० वाजता दरम्यान घडली. महामार्गाने ये-जा करणार्या लोकांनी ‘बर्निंग व्हॅन’ (Burning van) चा थरार अनुभवला. माहिती मिळताच लाखनी पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यात आले. तोपर्यंत मात्र व्हॅनची राखरांगोळी झाली होती. आगीत कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. आगग्रस्त व्हॅनमध्ये किती रक्त होते हे कळू शकले नाही. आगीचे कारण स्पष्ट झाले नव्हते.