परभणी(Parbhani):- येथील महसुलच्या पथकाने बुधवार १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास धसाडी येथे नदीपात्रात कारवाई करत वाळू उपश्याचे तराफे नष्ट केले आहेत. दैठणा पोलीसांच्या (Police)मदतीने कारवाई करण्यात आली.
अंदाजे २० ब्रास वाळू नष्ट करण्यात आली
उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसीलदार डॉ.संदिप राजपरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार पकवाने, मंडळ अधिकारी सचिन शिंदे, तलाठी बिडगर, महसूल सेवक बबन गोरे, रासवे, मारोती पवार, अशोक चौधरी, अशोक म्हात्रे, आकाश सुर्यवंशी, दैठणा पोलीस ठाण्याचे सपोनि जायभाय, पोलीस अंमलदार कुकडे, बहुरे, पोलीस पाटील नाटकर यांच्या पथकाने कारवाई केली. धसाडी नदी पात्रात दोन तराफे जाळून टाकण्यात आले. अंदाजे २० ब्रास वाळू नष्ट करण्यात आली. तर ४ ब्रास वाळू तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आणून टाकण्यात आली आहे.