आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या बदली निर्णयाचे केले स्वागत
परभणी (Shiv Sena) : महापालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांची बदली झाल्यानंतर (Shiv Sena) शिवसेना शिंदे गटाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. आयुक्तांच्या बदली निर्णयाचे स्वागत करण्यात आले. आपल्या लहरी स्वभावामुळे शहरातील सामान्य नागरीक व महापालिका कर्मचार्यांना वेठीस धरणार्या मनपा आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीसाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. अखेर शासनाकडून या मागणीची दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांची बदली करत सर्वसामान्य परभणीकरांना न्याय देण्याचे काम केले. आयुक्तांच्या बदली निर्णयाचे स्वागत करत फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी बाळासाहेब पानपट्टे, विजय शेळके तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
पाठपुराव्याला आले यश
महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांची बदली व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. मागील सहा महिन्यात दोन वेळा त्यांची बदलीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पोहोचली. मात्र आयुक्तांनी राजकीय हितसंबंध वापरत बदली थांबविली. अखेर (Shiv Sena) मुख्यमंत्र्यांकडे केलेले पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्र्यांनी आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या बदलीचे आदेश दिले.
– प्रविण देशमुख, शिवसेना नेते.