चौथ्यांदा फुटली पाईपलाईन
गुत्तेदारावर कारवाई करण्यास मात्र नगरपालिका प्रशासन करतेय टाळाटाळ
कळमनुरी (Isapur Dam) : कळमनुरी ते ईसापुर धरण (Isapur Dam) जाणाऱ्या रस्त्याचे खोदकाम सुरू असून संबंधित गुत्तेदाराच्या मनमानी कारभारामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी चौथ्यांदा फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली असून, यामुळे शहरवासीयांना परत एकदा निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.
ईसापुर रोडवरील (Isapur Dam) ढोलक्याच्या वाडी जवळ कळमनुरी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी असून याच मार्गावर रस्त्याचे खोदकाम जेसीबीच्या साह्याने सुरू असून रस्त्याचे खोदकाम सुरू असतानाच दि.१२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास कळमनुरी शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सुटली व यातून हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली पाणीपुरवठा सुविधा ही अत्यावश्यक सेवेमध्ये ते गुत्तेदाराला माहीत असूनही गुत्तेदार आपला मनमानी कारभार थांबविण्यास तयार नाही.
यापूर्वी सुद्धा तीन वेळेस खोदकाम करतानाच (Isapur Dam) पाईपलाईन फुटल्याने शहरवासीयांना आठात दिवस निर्जळीचा सामना करावा लागला आहे व आता देखील पाईपलाईन फुटल्याने शहरवासीयांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. परंतु या गुत्तेदारावर कारवाई करण्यास नगरपालिका प्रशासन हे टाळाटाळ करीत असल्यास ही चर्चा शहरात होत आहे. पाईपलाईन फुटण्याची ही चौथी वेळ असून आता तरी संबंधित गुत्तेदारावर नगरपालिका प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी शहरवासीयातून होत आहे.