खामगाव (Khamgaon ) :- अकोला ते इंदौर या मध्य प्रदेश रोड वेजच्या बसला (Bus) येथून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबोडा फाटा जवळ चुकीच्या दिशेने समोरून आलेल्या टिप्परने (Tipper) धडक दिल्यामुळे या मध्ये ३ लोक जागीच ठार (Deaths) झाले. तर एकूण 16 जखमी झाले. त्यापैकी 4 गंभीर जखमी आहेत. 16 जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात (Hospital) उपचारार्थ आणण्यात आले असून 4 गंभीर जखमींना अकोला येथे नेण्यात आले आहे .