खबरदारीच्या दृष्टीने आगाराने घेतला निर्णय
हिंगोली (Parbhani Violence) : परभणीत एका आरोपीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची घटना घडल्याने त्याचे अनेक ठिकाणी तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे खबरदारीच्या दृष्टीकोणातून जिल्ह्यातील तिन्ही आगाराने परभणी व नांदेड मार्गावरील बसफेर्या सोमवारी बंद ठेवल्या होत्या.
परभणी शहरात संविधान अवमान घटनेत तोडफोड व नुकसानीच्या प्रकरणात दाखल झालेल्या (Parbhani Violence) गुन्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी या आरोपीचा न्यायालयीन कोठडी दरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सोमवारी परभणी शहरात आणण्यात आला. त्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. यामुळे कुठेही बसेसची तोडफोड होऊ नये अथवा नुकसान होऊ नये या उद्देशाने १६ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील तिन्ही आगाराने परभणी व नांदेड मार्गावर बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
ज्यामध्ये वसमत आगारात एकूण ५८ बसेस असून त्यातील केवळ १० बसेस इतरत्र मार्गावर सोडल्या होत्या. १२० बसफेर्या रद्द केल्याने जवळपास ६ लाख रूपयाचे नुकसान झाले. हिंगोली आगारामध्ये एकूण ६१ बसेस आहेत. ज्यामध्ये दिवसभरात इतरत्र मार्गावर केवळ ३० बसेस सोडण्यात आल्या. जवळपास २१० बसफेर्या रद्द केल्याने आगाराचे ६ लाख रूपयाचे नुकसान झाले. (Parbhani Violence) कळमनुरी आगारानेही नांदेड व परभणी मार्गावरील बससेवा बंद ठेवल्याने जवळपास ४ लाख रूपयाचे नुकसान झाले. तिन्ही आगाराचे अंदाजे २० लाख रूपये नुकसान झाले आहे.