परभणी/गंगाखेड(Parbhani):- शहरातून राष्ट्रीय महामार्ग(National Highway) जात आहे. या रस्त्याचे कामही चालू आहे. परंतु हे काम अतिशय संत गतीने चालू असल्यामुळे या मार्गाने रहदारी करणाऱ्या नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे काम जलद गतीने करण्यात यावे अशा प्रकारची मागणी प्रवासी नागरिकाकडून पुढे येत आहे.
काम अतिशय संत गतीने चालू असल्यामुळे रस्त्या खड्डे की खड्ड्यात रस्ता अशा प्रकारची परिस्थिती
गंगाखेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग जिंतूर परभणी गंगाखेड अशा मार्गाने लातूरकडे जात आहे. तर परळी गंगाखेड पालम लोहा या मार्गाने राज्य महामार्ग जात आहे. या राज्य महामार्गाचे काम परळी ते गंगाखेड चालू आहे. परंतु हे काम अतिशय संत गतीने चालू असल्यामुळे रस्त्या खड्डे की खड्ड्यात रस्ता अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे. वाहतुकीला मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा निर्माण येत असून वाहनचालकांना मात्र वाहन चालवत असताना मोठी कसरत करावी लागत आहेत. या खड्ड्यामुळे बऱ्याच वेळेस छोटे-मोठे अपघातही झालेले आहेत. गंगाखेड बस स्थानक ते परळी नाका हा रस्ता तर खड्डेमय झाला आहे. या महामार्गाचे काम चालू जरी असले तरी संबंधित विभागाने याच्यावर डाग डूगी तरी करणे गरजेचे आहे.अशा प्रकारच्या प्रतिक्रिया संतप्त नागरीकाकडून पुढे येत आहेत.