परभणी (parbhani):- माजलगाव रस्त्यावरील ढालेगाव परिसरात महामंडळाचा थांबा नसतांना अनधिकृतपणे एस.टी.बसेस थांबविल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
परभणी, पाथरी आगारातून माजलगावकडे जाणार्या महामंडळाच्या बसेस (Corporation buses) पाथरीच्या पुढे गेल्यानंतर ढालेगाव परिसरातील एका अनधिकृत हॉटेलवर (Unauthorized hotel) थांबविण्यात येतात.
बसेस थांबलेले हे हॉटेल महामंडळाच्या अधिकृत थांब्याचे नाही
परभणीहून आलेली एम.एच.१४ बी.टी.१९८२ सह इतर तीन बसेस अनधिकृतपणे थांबल्याच्या पाहणीस आले. बसेस थांबलेले हे हॉटेल महामंडळाच्या अधिकृत थांब्याचे नाही. तसेच आवश्यकता नसताना प्रवाशांना अर्धा ते एक तास ताटकळत बसावे लागते. या हॉटेल परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतलेली नसल्यामुळे प्रवाशांची सुरक्षा वार्यावर असल्याचे म्हणावे लागेल. अनधिकृत थांब्यावर थांबणार्या बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय (Inconvenient)होत आहे. त्यामुळे हे अनधिकृत थांबे केंव्हा बंद होणार असा प्रश्न प्रवाशी विचारत आहेत.
’तो’ थांबा अधिकृत नाही
माजलगाव रस्त्यावरील ढालेगाव परिसरातील तो थांबा शासनाच्या महामंडळाचा अधिकृत नाही. महामंडळाच्या लाईन तपासणीत तेथे बस थांबल्याचे आढळून आल्यास चालक, वाहकांवर कार्यवाही करण्यात येते.
विनाकारण प्रवाशांना सहन करावा लागतो त्रास
परभणी, पाथरी वरून बसने निघाल्यास एका तासाच्या प्रवासात ढालेगाव परिसरात बस एका हॉटेलवर थांबा नसतांना थांबविल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना अर्धा तास ताटकळत बसावे लागल्यामुळे विनाकारण प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.