मानोरा(Washim):- तालुक्यात दुधातील भेसळमध्ये प्रमाण सर्वाधिक आहे. काही वर्षांपूर्वी दूध भेसळीच्या मुद्द्यावरुन तालुक्यात अनेक महिन्यापासून सर्वेक्षण झाले नाही . अन्न व औषधी प्रशासन विभागाने (Department of Drug Administration) तपासणी व सर्व्हेक्षण करून भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर कडक कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
पदार्थ पॅकिंग करताना, सफाई आणि स्वच्छता यांची अजिबात काळजी घेतली जात नाही. तर दुधात पावडरची सहजपणे भेसळ केली जाते, जी ग्राहकांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. ज्यामुळे ग्राहक किंवा हे दुध वापरणाऱ्या नागरिकांना कॅन्सर (Cancer)अथवा शारीरिक अपंगत्व येण्याची शक्यता आहे. तर भेसळयुक्त खवा, पनीर, विकून लोकांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम सुरू आहे. या भेसळयुक्त दुध जन्य पदार्थाचा
धंदा सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील मिठाई दुकान, किराणा दुकानात भेसळयुक्त दुध जन्य पदार्थ बाजारात व अन्य ठिकाणी विक्री होत आहे.व येथिल दुधात अन्य भेसळ युक्त पदार्थ मिसळून सदर दुध विक्री करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याकडे मात्र संबधित अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरी व ग्रामीण भागात दुग्धजन्य पनीर, खवा, ताक, दही, दुधची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.
भेसळयुक्त पदार्थामुळे डायरिया, असिडिटी आणि इनडायझेशनसारख्या सम्यस्या उद्भवू शकतात
सध्या दिवाळीच्या तोंडावर दुध जन्य पदार्थांची मागणी वाढलेली आहे. मानोरा शहरात व बाहेरील जिल्हयातील या पदार्थांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतात अनेक सण आहेत आणि या सणासुदीच्या काळात नागरीक खवा, मिठाई, पनिर, श्रीखंड, ताक, दही इतर पदार्थाची मागणी वाढत असते. त्यावेळी सदर सणा सुदीचा फायदा घेऊन संबधित भेसळयुक्त (adulterated) दुध जन्य पदार्थ बनवणारे घेत असतात. खवा, पनीर, श्रीखंड, ताक दही, किंवा इतर मीठाईंमध्ये भेसळयुक्त पदार्थ मिसळवली जात असते . त्याशिवाय तेल, मसाले आणि इतर वस्तू मध्यज सुध्दा भेसळ केली जात आहे. हे सगळे पदार्थ कमी किमतीत विकल्या जात आहेत. या भेसळयुक्त खवा आणि पनीरमुळे पोटदुखी, डायरिया, असिडिटी आणि इनडायझेशनसारख्या सम्यस्या उद्भवू शकतात. याच्या जास्त सेवनाने इंटरनल ऑर्गन्सवर वाईट परिणाम होऊ शकतो. सलग तीन महिने हेर भेसळयुक्त अन्न खाल्यास लिव्हर कँसर होण्याची शक्यता आहे.
मात्र मोठय़ा प्रमाणावर भेसळयुक्त पनीर सदर शहरात सर्रास विक्री केली जात आहे. सणासुदीच्या काळात दुग्धजन्य पदार्थांपासून मिठाई व इतर पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. त्याकरिता खवा, पनिर, दही, श्रीखंड यांची मोठी गरज असते. त्यासोबतच पनीरला बाजारात मोठी मागणी आहे. ब्रेडेड कंपनीचे पनीर, तसेच तूप महाग आहे. हे सर्व स्वस्त बाजारात सहज उपलब्ध होत असल्याने हे दुग्धजन्य पदार्थ भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही? पनीरमध्ये रिफाइंड पामोलिन तेल, वेअरमिट पावडर(Wormite powder), ग्लिसरॉल मोनो स्टेरीट (Glycerol Mono Stearate) या पदार्थांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे भेसळयुक्त पनीर स्वस्तात विक्री होण्याची शक्यता आहे. याकडे मात्र जिल्हा अन्न व औषधं प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्य ध़ोक्यात आले आहे . तालुक्यातील अश्या भेसळ करणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई करण्याची मागणी येथिल स्थानिक नागरिकांनी केली आहे.