गावठी कट्याचा धाक दाखवून अपहरण करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
आखाडा बाळापूर (Hingoli District Police) : कळमनुरी तालुक्यातील आडा सोसायटीचे चेअरमन तथा व्यवसायीक गणपत अप्पाराव शिंदे (वय 65वर्षे)हे नेहमीप्रमाणे आखाडा बाळापूर येथून गावाकडे दुचाकीने जात आसताना त्यांच अपहरण करण्यात आले होते अपहरणकर्तेनी एक कोटी रूपयाची खंडणी मोबाईलवरुन मागीतली आहे शुक्रवारी पहाटे तिन वाजता सदर प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खंडणी गुन्हा दाखल करण्यात आला. (Hingoli District Police) जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस प्रमुख अर्चना पाटील ,एलसीबी पोलीस निरीक्षक विकास पाटील मार्गदर्शनात पोलीस पथकाने, सायबर सेलने योजनाबद्ध तपास यंत्रणा राबवून 24 तासाच्या आत व्यवसायीकाची सुखरूप सुटका केली पोलीस दलाच्या कामगिरीच व्यापारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. पोलीस पथकाने सहा आरोपी ताब्यात घेतले आहे तपास दरम्यान आरोपी संख्या वाढण्याची शक्यता आहे.
आडा येथील गणपत शिंदे यांचे आखाडा बाळापूर येथे मुख्य रस्त्यावर शेतीउपयोगी साहित्य तयार करण्याच दुकान पंचवीस तिस वर्षापासून आहे. गुरुवारी ते नेहमीप्रमाणे कामे आटोपून दुचाकीने बाळापूर येथून आड्याला जात आसताना महामार्गावर कांडली फाटा पुलाच्या बाजूला सर्व्हिसरोडच्या बाजुला नालीवर त्यांची दुचाकी अपघात झाल्यासारखी पडली होती पण ते तेथे नव्हते ही बाब मुलाला समजली अपघात झाला समजून दवाखाने बघीतले पण ते आढळून आले नाही नंतर रात्री त्यांच्या मोबाईल वरून वाटसफ कॉल आला मुलाला तुझ्या वडिलांच अपहरण करण्यात आले त्यांना सोडवण्यासाठी एक कोटी रूपयाची खंडणी मागण्यात आली.
सदर प्रकरणी शुक्रवारी पहाटे अविनाश गणपत शिंदे फीर्यादीवरून अज्ञात आरोपींतानी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून वडिलांचे अपहरण करून कुठेतरी नेउन ठेवून वडिलांच्या मोबाईलवरून एक कोटी रुपयाची खंडणी मागीतली खंडणी दिली नाही तर वडिलांना खतम करून टाकतो अशी जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान सदर खळबळजणक प्रकारानंतर जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस प्रमुख अर्चना पाटील, पोलीस उपाधीक्षक दळवी,एलसीबी वरीष्ठ पोलीस निरीक्षक विकास पाटील,सायबर सेलचे सपोनी शिवसांब घेवारे,मल्लपिलू,विक्रम विठोबाने,आगलावे, आखाडा बाळापूर पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सपोनी डी.बी.बसवंते व पोलीस पथकाने तपास चक्र फीरवली सात विविध पथके तपासाकरता नेमण्यात आली होती.
जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या घटनेची सर्व सुत्रे आपल्या हातात घेऊन त्यानुसार जमवलेल्या माहितीची अचूक विश्लेषण व गोपीनाथ माहिती काढून तसेच तांत्रिक अभ्यास करून गुन्ह्यातील पिडीत व्यक्ती गणपत शिंदे यांची माहिती जमा केली त्याप्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी निष्पन्न करून सदर पिडीत व्यक्ती व अपहरण करणारे आरोपी यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अष्टीमंडी भागातून स्थानिक पोलीसांच्या मदतीने शिताफीने ताब्यात घेतले.
पोलीस पथकाने सुरजसिंग उर्फ सुरेंद्रसिंग गाडीवाले वय 24वर्षे रा.नंदीग्राम सोसायटी नांदेड, राध्येशाम पंजाबराव भालेराव वय 24रा.महाराणा प्रताप चौक नांदेड, शेख तौसीफ शेख समीर वय 32 वर्षे बारी कॉलणी छत्रपती संभाजीनगर, मुदसर हुसेन एकबाल हुसेन वय 24 खलवट चारमिणार हेद्राबाद तेलंगणा, सईद शाकेर अली सईद नासेर अली वय 28 कासमबारी दर्गा बडेगाव छत्रपती संभाजीनगर, शेख समीर शेख शफी 32 आसेफीय कॉलणी टाउन हॉल संभाजीनगर असुन यांच्यावर यापूर्वी खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी असे शरीराविरूद्ध अनेक गुन्हे दाखल असुन आरोपी हे गंभीर स्वरूपाचे रेकॉर्डवरीवरील आहेत. तसेच नांदेड कर्नाटक बिदर मध्ये जबरी चोरी व खुनाचा प्रयत्न करून फरार आसल्याच सुद्धा निष्पन्न झाले आसल्याच (Hingoli District Police) जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली 2 गावठी पिस्टल व 1 जिवंत काडतुस,गुन्ह्यात वापरलेले 9मोबाईल आसा 15 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीना जेरबंद करण्यात यांचा सहभाग
सदर प्रकरणातील व्यक्तीला सुखरूप सोडून आरोपी जेरबंद करण्यात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील मार्गदर्शनाखाली (Hingoli District Police) सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे,व राजेश मल्लपिलू ,पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने,कपील आगलावे, पोलीस अमलदार राजू ठाकूर, नितीन गोरे, किशोर सावंत, दत्ता नागरे, आकाश टापरे,आझम प्यारेवाले,विशाल खंडागळे, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, इरफान पठाण, प्रदीप झुंगरे,तसेच आखाडा बाळापूर पोलीस स्थानक पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सपोनी डी.बी.बसवंते, रामदास ग्यादलवाड, शेख बाबर,शिवाजी पवार, राजीव जाधव ,शेख अनसार व पथक,तसेच गुन्हे शाखा संभाजीनगर पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, पोलीस निरीक्षक गुरमे,सपोनी विनायक शेळके, ग्रामीण चे सपोनी मोटे यांनी सदर कार्यवाही यशस्वीरीत्या पार पाडली.