अमरावती (Amravati cotton) : सागरराज कॉटन इंडस्ट्रीजच्या वतीने आज (Amravati cotton) कापूस खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला. अडते नवलकिशोर मालपाणी तसेच कृष्णा मालपाणी यांच्या यांच्या माध्यमातून शेतकरी मो. जमील शेख नजीर यांचा कापूस खरेदी करण्याचा शुभारंभ करून कापसाला ७७७७ रुपये प्रति क्विंटल एवढा भाव देण्यात आला.विदर्भ आणि खान्देश मध्ये गेल्या १९ वर्षांपासून कापूस खरेदीचा शुभारंभ अमरावतीमधून होतो आणि येथूनच ठरलेले दर नंतर कायम करण्यात येतात.
रविवारी सागरराज कॉटन इंडस्ट्रीजचे संचालक राजकुमार पमनानी,व्यवस्थापकिय संचालक अनिल पमनानी, सागर पमनानी यांच्या हस्ते आज प्रथम कापूस खरेदी करून विधिवत पूजन करण्यात आले. शेतकऱ्यांना अधिकाधिक दर मिळावे असा सागरराज इंडस्ट्रीजचा नेहमी प्रयत्न असतो. विदर्भ आणि खान्देश मध्ये गेल्या १९ वर्षांपासून अमरावतीत कापूस खरेदीचा शुभारंभ होत असून येथूनच ठरलेले दर विदर्भ आणि खान्देश मधील शेतकऱ्यांना दिल्या जातात.आज खरेदी करण्यात आलेल्या (Amravati cotton) कापसाला ७७७७ रुपये प्रति क्विंटल दर निश्चित करण्यात आले असून सागरराज इंडस्ट्रीज चे राजकुमार पमनानी,व्यवस्थापकिय संचालक अनिल पमनानी, सागर पमनानी यांच्या हस्ते शेतकरी मो. जमील शेख नजीर यांचा नारळ दुपट्टा देऊन सत्कार देखील करण्यात आला.
अडते नवलकिशोर मालपाणी, कृष्णा मालपाणी यांच्या माध्यमातून विदर्भ तथा खान्देश मधील शेतकरी बांधव आपला (Amravati cotton) कापूस अमरावतीच्या बाजारात आणतो. त्यामुळे आज निर्धारित झालेल्या दरामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असून प्रथम कापूस खरेदी शुभारंभ प्रसंगी सागरराज इंडस्ट्रीज व मालपाणी यांना उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी खरीददार,अडते तथा असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.