देशोन्नती वृत्तसंकलन
तुमसर (Tumsar):- सरकारी जागेची खोट्या दस्ताऐवजाच्या आधारे खरेदी-विक्री करून सदर जागेचा फेरफार करण्यात आल्याचा प्रकार तुमसर तालुक्यातील देव्हाडी ग्राम पंचायत अंतर्गत समोर आला आहे. या प्रकरणी अनिरुद्ध जायस्वाल यांनी तुमसर पोलिसात तक्रार दाखल (Complaint filed) केली आहे.
तुमसर पोलिसात तक्रार दाखल
प्रकरण असे आहे की,तुमसर तालुक्यातील मौजा देव्हाडी येथील गावाच्या मुख्य रस्तेच्या बाजुला असलेली शासकिय जागा ज्यामध्ये मागील 50 वर्षापासून अनिल जायस्वाल यांचे सायकल व ईलेक्ट्रीकल दुरुस्तीचे सुरू असलेले दुकान ग्यानेंद्रसिंह रामबहादुरसिंग परिहार चे मालकी हक्काचे आहे. असे खोटे व बनावटी दस्त तयार करून देव्हाडी येथील व्यवसायी मंगेश बिसराम बानासुरे यांचे नावाने नोंदणीकृत विक्री खत तयार केले. सदर प्रकरणात अर्जदाराने पोलीसांकडे दिलेली तक्रारीनुसार ग्रामपंचायत देव्हाडीचे ग्रामविकास अधिकारी यांनी शासकिय जागेवर असलेली मालमत्ता क्र. 12 वर जुन्या धारकाचे नांव कसल्याही कार्यालयीन किंवा न्यायालयीन आदेशाव्यतीरिक्त कमी करून ग्यानेंद्रसिंग रामबहादुरसिंग परीहार या व्यक्तीचा नावाचा उल्लेख करून दिनांक 18.09. 2023 रोजी नमुना 8 निगर्मीत केले आणि त्यासोबत दिनांक 27.09.2023 रोजी एक खोटा चतुर्सिमा प्रमाणपत्र देवून त्या चतुर्सिमेच्या प्रमाणपत्रामध्ये ग्यानेंद्रसिंग रामबहादुरसिंग परीहार, ला वरील मालमत्ता क. 12 चा मालकच घोषीत करून टाकला.
ग्रामपंचायत देव्हाडी येथील प्रकार
दुय्यम निबंधक यांनी यांनी दोन्ही दस्तांच्या आधारे दिनांक 17. 01.2024 रोजी नोंदणीकृत दस्त क. 183/2024 ला मंजुरी दिली. सदर दस्त वारस हक्काने मिळालेली जमीन च्या आधारे करण्यात आला, सदर दस्तामध्ये साक्षदार (witness) विकास रामसिंग परीहार हा ग्यानेंद्रसिंग रामबहादुरसिंग परीहार, चा चुलत भाऊ आहे. तर प्रश्न हा निर्माण होते की, सदर नमुना 8 मध्ये विकास रामसिंग परीहार चा नांव का समाविष्ठ नाही? तसेच खरेदीदार मंगेश बिसराम बाणासुरे, हे देव्हाडी येथील मोठे व्यवसायी आहे आणि त्यांना माहिती असतांनादेखील त्यांनी विवादीत तसेच दुस-याचे ताब्यातील जागा ग्यानेंद्रसिंग रामबहादुरसिंग परीहार यांचेकडून का बरं खरेदी केली? अनिल अनिरूद्ध जैसवाल, यांनी दिलेल्या माहिती नुसार माहे फेब्रुवारी 2023 मध्ये सदर जागा विकास रामसिंग परीहार हे मंगेश बिसराम बाणासुरे, यांना अनोंदणीकृत दस्ताच्या आधारे बी. टी.गि-हीपुजें ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत देव्हाडी यांचेसोबत संगणमत करून फेरफार करण्याचा प्रयत्न केला होता म्हणून अनिल जायस्वाल यानी दिनांक 17.02.2023 रोजी ग्रामपंचायत देव्हाडी व पंचायत समीतीकडे तक्रार केली तसेच यांनी वकीलामार्फत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनीयम च्या कलम 180 अन्वये दिनांक 16.03.2023 रोजी कायदेशिर नोटीस सुद्धा दिला होता.
नमुना-8 व प्रमाणपत्र हा मालकी हक्काचा पुरावा नाही
नोटीस प्राप्त होउनही ग्रामविकास अधिकारी यांनी त्याचा उत्तर दिले नाही व त्या अनोंदणीकृत दस्ताच्या (Unregistered Staff) आधारे फेरफार होऊ शकला नाही. बेकायदेशिर कृत्याला कायदेशिर दर्शवून शासकिय जागा ज्यावर जायस्वाल यांचा जुना ताबा आहे ती बानासुरे यांना देण्याचा हेतूने आपसी संगणमत करून खरेदीदार, विक्रीदार आणि साक्षदार यांनी ग्रामविकास अधिकारी (Village Development Officer) सोबत मिळून विनाकायदेशिर दस्ताच्या आधारे मालमत्ता क. 12 चा नमुना तयार केला आणि जागेची नोंदणीकृत विक्रीखत करण्याचा हेतूने खोटा व बनावटी चतुर्सिमा प्रमाणपत्र (Fake Chatursima certificate) तयार केला. कोणत्याही स्थानीक स्वराज्य सस्था जी ग्रामपंचायत, नगरपंचायत अथवा नगरपालीका द्वारे देण्यात आलेले नमुना-8 व प्रमाणपत्र हा मालकी हक्काचा पुरावा नाही.
दुय्यम निबंधकाने जागेची नोंदणीकृत विक्री खत मंजुर केली
याबाबतची माहिती असतांना सुद्धा दुय्यम निबंधकाने जागेची नोंदणीकृत विक्री खत मंजुर केली.जागेची नोंदणी करण्यापुर्वी सदर जागा वास्तविक गावठाण मध्ये आहे किंवा नाही, त्याकरीता गावठाण नकाश्याची पडताळनी करणे, सक्षम महुसल अधिकारी यांची परवानगी बाबत सहानिशा न करता दस्त नोंदणी करण्यात आला आहे, ही अतीशय गंभीर स्वरूपाची बाब असुन शासकिय जागा खाजगी व्यक्तींना विकण्याचा कट आहे. तरी संबंधीतांवर योग्य ती कार्यवाही व्हावी याकरीता दस्ताऐवजीय पुराव्यासह अनिरुद्ध जायस्वाल यांनी पोलीस स्टेशन तुमसर यांना तक्रार केली आहे.