लातूर (Latur) :- बदलापूरमधील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची (torture) घटना ताजी असतानाच लातूरच्या औसा तालुक्यातही अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. औसा तालुक्यातील भेटा येथे एका ७० वर्षीय वृद्धेवर ३६ वर्षाच्या नराधमाने अत्याचार करून खून (Murder)केला आहे.
७० वर्षीय वृद्धेवर ३६ वर्षाच्या नराधमाचा अत्याचार
राज्यात एका मागून एक अत्याचार आणि बलात्काराच्या (rape) घटनेचे सत्र सुरूच आहे. बदलापूरमधील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच लातूरच्या औसा तालुक्यातही अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. येथे एका 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 36 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या घटनेबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.