हिंगोली(Hingoli):- महाराष्ट्रासह देशातील शेतमजूर, शेतकरी, व्यापारी, बेरोजगार आदींच्या अनेक समस्या व प्रश्न निर्माण झाल्याने हिंगोलीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमेटी जिल्हा उपाध्यक्षांच्यावतीने २१ जून रोजी शासनाच्या विरोधात चिखलफेको आंदोलन करण्यात आले.
शेतकर्यांच्या शेतीमालाल हमीभाव मिळत नाही
याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात २१ जूनला दिलेल्या निवेदनात नमूद केले की, महाराष्ट्रात(Maharashtra) व देशात एकाच पक्षाचे सरकार असून या काळात शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, बेरोजगारांच्या अनेक समस्या व प्रश्न निर्माण झाले असल्याने सर्वत्र अस्थिरता निर्माण झाली आहे. शेतकर्यांच्या शेतीमालाल हमीभाव मिळत नाही, लाखो शेतकर्यांना पीकविमा अद्यापही मिळाला नाही, शेतकर्यांना आवश्यक असणारे खत, बी-बियाणे, किटकनाशके आदींचे भाव गगणाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकरी (Farmer)हैराण झाले आहेत. शेतकर्यांना बोगस बियाणे मिळत असल्याने लाखो शेतकर्यांचे श्रम, वेळ वाया जाऊन आर्थिक नुकसान होत आहे. शेतकरी आत्महत्याही (Suicides)वाढल्या आहेत, शेतमजुरांना हाताला काम उपलब्ध होत नाही, परिणामी रोजगारीचे प्रमाण वाढले आहे. कुशल व अकुशल तसेच प्रशिक्षित युवकांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यातील उदासिनता वाढली असल्याने अनेकजण आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहेत. अशा बाबतीत शासन उदासीन आहे.
व्यापारी शासनाला जीएसटी, इनकमटॅक्स भरतात त्यामुळे महसूल व उत्पन्न प्राप्त होते
व्यापारी शासनाला जीएसटी(GST), इनकमटॅक्स भरतात त्यामुळे महसूल व उत्पन्न प्राप्त होते; परंतु त्यांना कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही. या कारणामुळे शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. निवेदनावर जिल्हा काँग्रेस कमेटीचे(congress committee) उपाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, मा.शहराध्यक्ष बापूराव बांगर, कृउबास संचालक शामराव जगताप, मा.सेनगाव तालुकाध्यक्ष विनायकराव देशमुख, मा.जि.प.सदस्य प्रकाशराव थोरात, प्रकाशराव वाघ, सरपंच माणिकराव देशमुख, माजी नगराध्यक्ष सुधीर अप्पा सराफ, माजी नगरसेवक अनिल नैनवाणी, अ.माबुद बागवान, जावेद कुरेशी, आरीफ लाला, मिलींद उबाळे, बाशिद मौलाना, महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे विशाल घुगे, बंटी नागरे, शुभम सराफ, विक्की सराफ, पिनू कांबळे, चांदू प्यारेवाले, जुबेर मामू, शासन कांबळे, महेश थोरात, दत्तराव लोंढे, शिवम तडकसे, रामदास थोरात, अंकुश बांगर,अजय सूर्यवंशी, शेख पैâजल, इरफान पठाण, शेषराव माणिकराव, यादवराव साहेबराव, अशोक डोल्हारे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
निवेदन देताना उबाठाचे पदाधिकारीही उपस्थित
याप्रकरणी नायब तहसीलदार सचिन जोशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकार्यां समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार डॉ.संतोष टारफे, जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, आनंदराव जगताप यांचीही उपस्थिती होती.