आंबा चौंडी (Hingoli) :- वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथे ८ सप्टेंबर रोजी आदिवासी समाजाचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणूून माजी राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी जि.प.अध्यक्ष गणाजी बेले, राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाचे (शरदचंद्र पवार गटाचे ) जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी जि.प.उपाध्यक्ष अंबादास भोसले हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदीवासी युवक कल्याण संघाचे राज्याध्यक्ष माजी आ.डॉ.संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य डॉॅ. सतिश पाचपुते, दौलत घुबडे, शाम कदम, फारूख, बाबु दळवी, यल्लपा मिटकरी, सरपंच सत्यनारायण बोखारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माणिकराव बोखारे, गुलाबराव कदम, चेअरमन गोपाळराव कदम, चेअरमन भिमराव साबळे, भगवानराव कावळे, पुर्णाचे संचालक नितिन महागावकर, गजानन कदम, बाबुराव दळवी, मिटकर, काळुराम कुरुडे, डॉ. नागोराव जांबुतकर आदी उपस्थित होते.
वाई गोरखनाथ येथे आदिवासी संवाद मेळावा
संवाद मेळाव्यात विविध प्रश्नावर चर्चावाई गोरखनाथ येथे आदिवासी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून प्रामुख्याने वनपट्टे आदिवासी समाजाच्या (Tribal community) नावावर करणे, घरकुलाचा निधी वाढवुन देणे, आदिवासी समाजाच्या मुुलांच्या नौकरीचा प्रश्न निकाली काढणे यासह विविध प्रश्नावर या संवाद मेळाव्यात चर्चा करून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की, आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याचे ग्वाही दिली. तसेच माजी आ. डॉ. संतोष टारफे व डॉ. सतिश पाचपुते यांनी आदिवासी समाजाने एकजुटीने जयप्रकाश दांडेगावकर यांच्या व महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याची हमी दिली आहे. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाजासह महिला, पुरूष उपस्थित होते.