नाशिक (Nashik):- समाजहिताचे, गरजवंतांची गरज भागवण्याचे तसेच सुजाण, सज्ञान नागरिक घडवण्याचे कार्य करणाऱ्या, तसेच निस्वार्थपणे सोशल वर्क करणाऱ्या व्यक्तींना समाजापुढे आणून त्यांना सन्मानित करण्याचे कार्य करणाऱ्या लायन्स क्लब ऑफ नासिक रॉयल्स (Lions Club of Nashik Royals) तर्फे नुकताच आदर्श शिक्षक सन्मान सोहळा रचना विद्यालय येथील एस.एम.जोशी सभागृह येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या शिक्षण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र समाज सेवा संघ, नाशिक चे अध्यक्ष श्री.सुधाकर साळी तसेच लायन्स इंटरनॅशनल प्रांत 3234 डी २ चे माजी प्रांतपाल श्री.राजेश कोठावदे उपस्थित होते.
१५ आदर्श शिक्षकांचा करण्यात आला गौरव
कार्यक्रमात बोलताना साळी सरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ते म्हणले की आज गुरुजनांनकडे युवा पिढीचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, त्याला आज प्रगत झालेले तंत्रज्ञान काही अंशी कारणीभूत आहे, पण अशा प्रत्यक्ष शिक्षण देणाऱ्या गुरूंचा तुम्ही या डिजिटल युगात सन्मान करत आहात, हे तुमचे कार्य खरोखर खूप कौतुकास्पद आहे. तसेच लायन्स चे माजी प्रांतपाल(Former Governor) राजेश कोठवदे यांनी लायन्स क्लब हे सोशल प्लॅटफॉर्मवर कशा प्रकारे कार्य करते याचे महत्व विशद केले.
आदर्श शिक्षकांचा सन्मान करून त्यांना गौरविण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्तविक लायन्स क्लब ऑफ नासिक रॉयल्स चे विद्यमान अध्यक्ष प्रशांत कोतकर यांनी केले. प्रशांतजी बोलताना म्हणाले की एक शिक्षक आपल्या आयुष्यात किती मोठे योगदान देत असतो , हे आपल्याला आपल्या करियरला दिशा मिळाल्यानंतरच समजते. सदर उपक्रमात मान्यवरांच्या हस्ते रचना विद्यालयातील शिवदास महाजन, स्नेहल देशपांडे, नीता गांगुर्डे, रंजना पाडवी, सुभाष दळवी, खुशवंतसिंग पाटील, उमेश बच्छाव, महेश चौधरी, रेखा बागुल, प्रीती चौधरी, सुनील गांगुर्डे, पुरुषोत्तम ठोके, मूजान्जी खिस्ते, अनिता निकम, अर्चना कोठावदे आदी गुरुवर्य आदर्श शिक्षकांचा सन्मान करून त्यांना गौरविण्यात आले.
मोठ्या संख्येने पालक शिक्षक विद्यार्थी उपस्थित
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लायन रिजन चेअरपर्सन राजू व्यास, लायन झोन चेअरपर्सन सतीश आलई तसेच लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्स चे संस्थापक अध्यक्ष मनिष अहिरे आदी उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल तर्फे अध्यक्ष प्रशांत कोतकर, सचिव सागर कोठावदे, खजिनदार शुभम अमृतकर तसेच लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्स परिवारातील सर्व सदस्य तसेच समन्वयक म्हणून ज्ञानदेव बोंडे, प्रमोद शिरोडे आदींनी केले होते. कार्यक्रमास फर्स्ट लेडी चेअरपर्सन सौ.वैशाली प्रशांत कोतकर , सौ.मोनाली अमृतकर, हितेश पगार तसेच मोठ्या संख्येने पालक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.