परभणी (Parbhani):- मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण संदर्भाने निघालेल्या शांतता रॅलीत (Rally)सहभागी एकाच्या गळ्यातील नव्वद हजार रुपये किंमतीची तीन तोळ्याची सोन्याची(Gold Chain) चैन लंपास करण्यात आली. ही घटना रविवार ७ जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जिंतूर रोड परिसरात घडली. सदर प्रकरणी ८ जुलैला कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील रोड शो
रावसाहेब रुस्तुमराव रेंगे यांनी तक्रार दिली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या शांतता रॅलीत त्यांना क्रेनच्या सहाय्याने मोठा हार घालण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्यानुसार रावसाहेब रेंगे आणि त्यांचे मित्र महाराणा प्रताप चौक येथे थांबलेले होते. मनोज जरांगे पाटील यांची रॅली आली असता अचानक मोठ्या प्रमाणात गर्दी (Crowd) झाली. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने रावसाहेब रेंगे यांच्या गळ्यातील नव्वद हजार रुपये किंमतीची सोन्याचे चैन लंपास केली. कोतवाली पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास सपोनि. राम गिते करत आहेत.