चंद्रपूर (वरोरा/chandrapur):- वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील लहान मुलासह महिलेने आत्महत्या(suicide) केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.ही आत्महत्या कोणत्या कारणावरून झाली असावी याचा अजून पर्यंत कोणतेही स्पष्ट कारण समोर आलेले नाही. घरगुती वादातून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
राहत्या घरीच आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त
शेगाव येथील रहिवासी नितेश पारोधे कृषी केंद्र व्यवसाय (Agricultural center business) शेगाव येथे करत असून त्यांना नऊ महिन्याचे एक लहान मूल होते. आज दुपारच्या सुमारास काही वैयक्तिक वादातून लहान मुलगा स्मित नितेश पारोधे वय 9 महिने यास विषारी पदार्थ (toxic substances) देऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर लहान मुलाचा उपचार रुग्णालय(Hospital) चंद्रपूर येथे सुरू आहे. यानंतर सौ पल्लवी नितेश पारोधे वय 27 वर्ष या महिलेने गळफास लावून राहत्या घरी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु मुलीकडील नातेवाईकांनी हत्या केल्याचा आरोप करीत शेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे. सदर प्रकरणात गुन्हा नोंद करून शेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव व त्यांचे सहकारी या सर्व प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.