Gondia:- आमगाव तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद (Zilla Parishad) प्राथमिक शाळा माल्ही, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रावणटोली, आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीरामटोली ह्या माल्ही गावातील तिन्ही शाळेची अवस्था खूपच वाईट आहे.
मुलांना खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे
ह्या शाळेंना अजिबात शौचालय (Toilet)नाही, शालेय आभार भिंत नाही शालेय गेट नाही, व्यवस्थित पटांगण नाही. पाण्याची सुविधा नाही स्वयंपाकासाठी व्यवस्थित खोली नाही शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत आहेत, व्यवस्थित शौचालय नसल्यामुळे शालेय विद्यार्थी व शिक्षक इतरांच्या घरी शौचालयाला जातात, लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस शालेय बूथ वर आलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रास झाला, स्वयंपाक खोलीला फटी पडल्यामुळे आजूबाजूला असलेल्या शेतातून परिसरातून विषारी साप (poisonous snake)स्वयंपाक खोलीमध्ये प्रवेश करू शकतात. त्यामुळे शालेय आहारात विष बाधा (poison barrier) सुद्धा होऊ शकते , तसेच मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी व बाहेरील उपयोगाच्या पाण्यासाठी वारंवार शिक्षण घेत असताना इतरांच्या घरी जावं लागतो, आवार भिंत नसल्यामुळे आजूबाजूला असलेल्या शेतीमधून शाळेच्या पटांगणात नेहमी साप विंचू येत असतात, ह्या सर्व गोष्टींच्या अभावामुळे मुलांना खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे.
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेताना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे
तसेच शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेताना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे, त्यांच्या सर्वांगीण विकास अपुऱ्या अवस्थेमुळे कुठेतरी कमी पडत आहे ह्या सर्व गोष्टी जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित करायला हव्यात कारण की शाळा ही जिल्हा परिषदेची आहे, जर 15 दिवसाच्या आत ह्या गोष्टी झाल्या नाहीत किंवा आश्वासन लिखित स्वरूपात मिळालं नाहीत तर शालेय शिक्षण प्रेमी गाव प्रमुख प्रशांत जी कोरे, शालेय अध्यक्ष राजेश जी शेंडे ,अविनाश जी मेश्राम यांच्यासोबत सर्व शाळा समिती व शालेय विद्यार्थ्यांसोबत तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसणार असे शालेय शिक्षण प्रेमी गाव प्रमुख प्रशांत जी कोरे व शालेय समितीने आवाहन केले आहे