लातूर (Latur):- ‘डायमंड स्पा’वर धाड टाकून स्वतःच्या फायद्यासाठी देहविक्रय करून घेणाऱ्या महिलेला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईतून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
‘डायमंड स्पा’च्या नावा खाली त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय
गोपनीय माहिती मिळाल्याने लातूर शहरातील बार्शी रोड परिसरामध्ये एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून स्त्रियांना बोलावून घेऊन ‘डायमंड स्पा’च्या नावा खाली त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याची खातरजमा पोलिसांकडून करण्यात आली. त्यानंतर सदरची बाब खरी असल्याचे निदर्शनास येताच दिनांक 27/11/2024 रोजी पोलीस निरीक्षक श्रीमती बबिता वाकडकर यांच्या नेतृत्वात एएचटीयु पथकाने बनावट ग्राहक पाठवून मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळून ती खरी असल्याचे निदर्शनास येताच लातूर शहरातील बार्शी रोड परिसरातील डायमंड स्पावर छापा मारला.
दोन पिडीत महिला व वेश्या व्यवसाय करून घेणारी महिला आढळून आली
त्याठिकाणी देहविक्री करीत असताना दोन पिडीत महिला व वेश्या व्यवसाय करून घेणारी महिला आढळून आली. या प्रकाराबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) रजिस्टर नंबर 840/2024 कलम 147 भारतीय न्याय संहिता व 3, 4, 5, अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियम 1956 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून कुंटणखाना चालणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती बबिता वाकडकर, पो.उपनि. शामल देशमुख, सुभाष सूर्यवंशी, पोह.सदानंद योगी, प्रकाश जाधव, मपोह.सुधमाती यादव, निहाल मनियार सर्व ने. आनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पथकाने केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसी (MIDC)चे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे करीत आहेत.
स्पामध्ये ठेवून वेश्याव्यवसाय
पिडीत महिलांकडून देहविक्री व्यवसाय (Prostitution business) करून घेणारे, स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर गावाच्या महिलांना स्वतःचे स्पा मध्ये ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेतात व आम्हाला काही रक्कम देऊन आमची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करतात असे पीडित महिलांनी सांगितले.