उदगीर(Latur) :- शासकीय कार्यालयामध्ये नोकरी लावतो, म्हणून 28 लाख 20 हजार रुपये घेऊन फसवणूक (Fraud) केल्यावरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुरुवारी (दि.9) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पत्रकार(journalist) बबन ज्ञानोबा कांबळे यांनी फिर्याद दिली होती.
उदगीरच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उदगीर शहरातील उदय पेट्रोल पंप व अनिल देसाई यांचे राहते घर या ठिकाणी 8 जानेवारी 2024 ते 5 जानेवारी 2025 या कार्यकाळात आरोपींनी बबन ज्ञानोबा कांबळे यांचा मुलगा इंद्रजीत बबन कांबळे यास राज्य उत्पादन शुल्क विभागात तसेच कांबळे यांचे नातेवाईक प्रवीण घोलपे यास कृषी विभागात (Department of Agriculture) व मंजुषा पांचाळ हिस पशुसंवर्धन विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकूण 28 लाख 20 हजार रुपये घेतले.
मात्र नोकरी काही लावली नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बबन ज्ञानोबा कांबळे (रा. आशा निवास, रो हाऊस नंबर 7, बिदर रेल्वे गेट, उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं.14/2025 कलम 420, 34 भादंविप्रमाणे अनिल दिगंबर देसाई मुधोळकर व पाटील या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार कदम करीत आहेत.