परभणी (Parbhani) :- लग्नाचे अमिष दाखवत पाच वर्ष शरिरीक संबध (Physical relationship) ठेवले. लग्ना विषयी विचारणा केल्यावर शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारी वरुन ३० डिसेंबरला पुर्णा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना पूर्णा शहरात घडली.
पिडीत ३० वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे. की, करण तारा माने याने पिडीतेला लग्नाचे अमिष दाखवून पाच वर्षांपासून संबध ठेवले. लग्ना विषयी विचारणा केल्यावर शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. पिडीतेने पुर्णा पोलीस ठाणे गाठत करण माने याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तपास पोउपनि. पडलवार करत आहेत.