चंद्रपूर (Chandrapur) :- जिल्ह्यात एकामागून एक घडत असलेली गुन्हेगारी(criminality) घटनांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान आज सोमवार दि. 12 ऑगस्ट रोजी भरदिवसा चंद्रपूर शहरातील बिनबा गेट जवळ अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर गोळीबार(firing) केला.
गोळीबारात एक जण गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल
बिनबा गेटजवळील रेस्टॉरंटमध्ये दुपारी ही घटना घडली. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी ज्या व्यक्तीवर गोळीबार केला तो घुग्घुस शहरातील कुख्यात आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी आरोपी हाजी या छोट्या नावाने जिल्ह्यात ओळखला जातो. गोळीबाराच्या या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात (Hospital)दाखल करण्यात आले असून, तो मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हा रुग्णालयासमोर नागरिकांची गर्दी होत आहे.