पाकिस्तानातून आले होते नागरिक
नवी दिल्ली: सीएए(CAA) भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्रे नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचा पहिला संच बुधवारी जारी करण्यात आला. केंद्र सरकारने १४ जणांना भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्रे जारी केली आहेत. सीएए प्रमाणपत्र जारी केल्यानंतर, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे . अर्जांची ऑनलाइन प्रक्रिया झाल्यानंतर 14 जणांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
केंद्रीय गृह मंत्रालयाने सीएए अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचा पहिला संच (CAA Indian Citizenship Certificates First Set) जारी केला आहे. सीएए च्या पहिल्या संचा अंतर्गत, केंद्र सरकारने 14 लोकांना भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्रे प्रदान केली आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी नवी दिल्लीत पहिल्या 14 लोकांना सीएए अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रे सुपूर्द केली. यावेळी सचिव पोस्ट, डायरेक्टर (आयबी), रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सीएए प्रमाणपत्र जारी केल्यानंतर, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू झाली.
बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी डिसेंबर 2019 मध्ये सीएए लागू करण्यात आला होता. हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन नागरिक 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आले होते त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले आहे .