श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा
गुरुकुंज/मोझरी (Calcutta Outcry March) : पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथील आर. जी. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर अमानुषपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपी नराधम व्यक्तीला फाशी शिक्षा देण्यात यावी यासाठी येथील श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयापासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीपर्यंत आक्रोश मोर्चा (Calcutta Outcry March) आज काढण्यात आला.
या (Calcutta Outcry March) मोर्चामध्ये प्राचार्य मुरलीधर खारोडे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. पी बी पाळेकर, अध्यात्म विभाग प्रमुख डॉ. राजाराम बोथे, ज्येष्ठ पत्रकार शरद कांडलकर, धनराज बारबुद्धे, डॉ जगदीश पाटील, डॉ. अमोल पाटील, डॉ. सुनील बोरकर, डॉ. प्रमोद पोदाळे, डॉ. लक्ष्मीकांत पायमल्ले, यांच्यासह सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभागी झाले होते.