हिंगोली(Hingoli):- ४ जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथील डीईआयसी विभागामध्ये आरबिएसके व डीईआयसी विभाग (DEIC Division) यांच्या सयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व ० ते १८ वर्ष वयोगटातील हिमोफेलीया(Hemophilia), सिकलसेल(sickle cell), बॅलेसेमिया, अनेमिया व इतर रक्त संबंधित आजाराच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील शिबिरामध्ये ४४ लाभार्थींना रुग्णसेवा देण्यात आली.
या शिबिरासाठी सुपरस्पेशलिस्ट डॉ. श्रुर्ती तोष्णीवाल (रक्तविकारतज्ञ) यांनी रुग्णाची तपासणी केली. तसेच रुग्णांना रक्त तपासणी, औषधी, सेवा देण्यात आली तसेच बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट उपचार याबाबत सल्ला देण्यात देण्यात आला. सदरील शिबिरामध्ये डॉ. नितीन तडस (जिल्हा शल्यचिकित्सक हिंगाली), डॉ. गोपाळ कदम (अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली) डॉ. स्नेहल नगरे (बालरोगतज्ञ) श्री. संतोष नांदुरकर (डीईआयसी व्यवस्थापक), लक्ष्मण गाभणे (आरबिएसके समन्वयक) जिल्ह्यातील आरबिएसके अधिकारी व कर्मचारी, डीईआयसी विभागातील सर्व कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.