बुलढाणा (Prophet Muhammad) : मोहम्मद पैंगबर यांना मानव जातीसाठी करुणा बनवून पाठविले आहे, असे कुराणमध्ये म्हटले आहे. (Prophet Muhammad) “मोहम्मद पैंगबर सर्वांसाठी अभियान” बुलढाणा अंतर्गत मुस्लीम बांधव ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अभियान राबवून वृक्षारोपण करणार आहेत.
करुणेचे प्रतिक हजरत मोहम्मद पैंगबर (Prophet Muhammad) यांच्या जयंतीदिनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अभियानातंर्गत झाडे लावण्यात येणार आहे. जो कोणी एखादे झाड लावतो किंवा शेतीमध्ये बी-पेरतो. पक्षी, मानव किंवा प्राणी जे काही फळे खातात ते झाड लावणाऱ्याकडून दान (सदका) आहे. माणुसकी आणि अल्लाहसाठी मंदिर, मशिदी, विहार, पोलिस स्टेशन, दर्गे, स्मशानभूमि, सार्वजनिक ठिकाणी मुस्लीम समाजातर्फे वृक्षारोपण करुन (Prophet Muhammad) मोहम्मद पैंगबर जयंती साजरी करण्यात येणार आहे.