पुसद (Sharad Maind) : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैन्द (Sharad Maind) यांच्या प्रचारार्थ ग्रामीण सह शहरी भागात समर्थकांचा संपर्क दौरा संपन्न झाला. ग्रामीण भागात काल लोणी, आरेगाव (तांडा) इंदिरानगर, पाळोदी काटखेडा, तरोडी, हुडी तांडा, हुडी गाव चिकणी, हेगडी, भाटंबा, चिलवाडी, राजननगर, बोरगडी, बोरी मुखरे, सांडवा, मांडवा, काकडदाती या गावांमध्ये जाऊन शरद मैंद यांनी मतदारांना आपली उमेदवारी का? याबाबत भूमिका समजावून सांगितली.
मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी इव्हीएम मशीन वरील तुतारी वाजवीणारा माणूस या निशाणी समोरील बटन दाबून निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी वरील सर्व गावातील महिला, पुरुष व युवा मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शरद मैंद (Sharad Maind) यांच्यासाठी निरनिराळ्या प्रभागात दररोज सकाळ संध्याकाळ प्रचार फेऱ्या निघत आहेत. नवीन पुसद मधील हनुमान मंदिरात सौ. शुभदा शरद मैंद यांनी पूजा करून प्रचार फेरीस सुरुवात झाली. प्रचार फेरीत सहभागी समर्थकांनी घरोघरी जाऊन महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शरद मैद (Sharad Maind) यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या बोधचिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले.
या प्रचार फेरीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन अपरिहार्य म्हणून परिवाराची सत्ता उलथून विकासाचे मंदिर उभारण्याचा संकल्प केला.




