अमरावती (Amravati):- जगातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन असणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (All India Student Council) विविध कार्यक्रमात्मक, आंदोलनात्मक, रचनात्मक उपक्रमांशी आपण परिचित आहातच. विद्यार्थी व राष्ट्रहिताचे काम करण्यास विद्यार्थी परिषद सदैव सक्रिय असते. तर यावेळेस परिषदेच्या पोटे कॅम्पस अंतर्गत काश्मिर येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने व श्रद्धांजलीचा कार्यक्रम(tribute program) घेण्यात आला.
अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने व श्रद्धांजलीचा कार्यक्रम
या कार्यक्रमावेळी काश्मिरमध्ये (Kashmir)झालेल्या अतिरेकी हल्ल्याबद्दल चर्चा करण्यात आली. वारंवार होणारे अतिरेकी हल्ले, यावर उपलब्ध असणारे उपाय, भविष्यातील अश्या हल्ल्यासाठी जरुरी असलेली पुर्व तयारी यावर चर्चा करण्यात आली. यावेळी अमरावती विभाग संयोजक अनुराग बालेकर, गाडगेनगर भाग मंत्री निकेत कलाने, पोटे कॅम्पस अध्यक्ष अनिश बोदडे, पोटे कॅम्पस मंत्री ओम पटोंड, श्रावणी जवंजाळ तसेच पोटे कॅम्पस परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक आदी लोक उपस्थित होते.