अनेक शेतकर्यांच्या जमिनी पाण्याने खरडल्या
डोंगरकडा/हिंगोली (Canal Irrigation) : १ जून रोजी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या (Panganga Project) नांदेड जिल्ह्यात जाणार्या मुख्य कालव्याला भलेमोठे भगदाड पडल्याने चालू असलेल्या रोटेशन पाण्यातील लाखो लिटर क्युसेक्स पाणी वाया गेल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंगरकडा येथून पाच कि.मी.अंतरावर असलेल्या वरुड मायनरच्या शेजारी चोरंबा शेत शिवारातील ऊर्ध्व (Panganga Project) पैनगंगा प्रकल्पाचा उजवा मुख्य कालवा (कॅनॉल) नांदेड जिल्ह्यात सिंचनासाठी जातो.
पण ह्या कालव्याला जसे उंदीर डोंगर पोखरतो त्याच प्रमाणे ह्या (Canal Irrigation) कॅनॉलला भलेमोठे भगदाड पडल्याने सिंचनासाठी सुरू असलेल्या पाणी पाळीतील लाखो लिटर क्युसेक्स पाणी ४२ सेल्सीअस अशा तापमानात वाया गेले आहे. भर उन्हात शेतकरी पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने आपल्या शेतीची मशागत करून जमीन भुसभुशीत करून तापण्यासाठी तयार करून ठेवतो, आणि काही नालायक अधिकारी, कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यावर पाणी फेरले जाते. १ जून रोजी सुद्धा हेच घडले चुकी कोणाची अन भोगावे लागले मात्र शेतकर्यांना मुख्य कॅनॉलला पडलेल्या भगदाडा मुळे मशागत करून ठेवलेल्या शेती अक्षरशः खरडून गेल्या. शेतात उभ्या असलेल्या ज्वारी, केळी पिकात गुढग्यावर पाणी साचल्याने शेतीला तलावाचे स्वरुप नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरून स्पष्ट दिसत आहे. काही ठिकाणी तर शेतकर्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी बोटी ने जावे की कशाने हेच समजत नव्हते.
आता झाल्या प्रकारावर पांघरून घालण्यासाठी हे रोटेशन कुरुंदा मायनर ला वळविले जाते आणि मुख्य कालव्याला पडलेले भगदाड दुरुस्त करून आपण आपलीच पाठ थोपटली जाईल हे सत्य आहे. या (Canal Irrigation) कॅनॉलची मागील काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती केली होती हे विशेष.मग प्रश्न पडतो तो ह्या कॅनॉलला पडलेल्या भगदाडमुळे शेतीचे झालेले मोठ्या प्रमाणात नुकसान ह्यास कोण जबाबदार, कॅनॉलची लाखो रुपये खर्च करून केलेली दुरुस्ती खरंच योग्य केली होती का मग आता पडलेले भले मोठे भगदाड यास कोण जबाबदार?,असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.