गडचिरोली (Gadchiroli) :- आमत्त्या जमिनी समृद्धी महामार्गासाठी (Prosperity Highway) देणार नाही. शासनाला जमिनी जबरदस्तीने हिसकाऊ देणार नाही. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट थांबवून प्रस्तावित असलेला भंडारा-गडचिरोली हा समृद्धी महामार्ग शासनाने तात्काळ रद्द करावा, अशी एकमुखी मागणी ब्रह्मपुरी येथील स्वागत मंगल कार्यालयात आज ८ फेब्रुवारी रोजी आयोजित शेती व शेतकरी बचाव परिषदेत शेतकऱ्यांनी केली. यावेळी चंद्रपूर (Chandrapur) व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी या परिषदेला उपस्थित होते.
भंडारा-गडचिरोली हा समृद्धी महामार्ग शासनाने तात्काळ रद्द करावा
विकासाच्या नावाखाली जनतेचा पोशिंदा म्हणवणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकार (Central Govt) यांच्याकडून भूमिहीन करून पोटाची भाकर हिसकावून घेण्याचा शासनाचा डाव आहे. शासन शेतकऱ्यांना दारिद्र्याच्या खाईत टाकण्याचे काम करीत आहे. मेहनतीने घाम गाळून कष्टाने मिळवलेली जमीन कदापि सरकारला देणार नाही तसे झाल्यास भविष्यात येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. आपल्यावरील होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बाचित शेतकरी एकत्रित येऊन मोठा लढा उभारण्यासाठी शेती व शेतकरी बचाव परिषद घेण्यात आली. समृध्दी महामार्गाची निर्मिती करण्यासाठी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची जमीनी जात आहेत.
शासन शेतकऱ्यांना दारिद्र्याच्या खाईत टाकण्याचे काम करीत आहे
या परिषदेला मुख्य मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन श्रीसागर, राज्य कार्याध्यक्ष गडचिरोली चे डॉ. महेश कोपुलवार, किसान सभा गडचिरोली वे देवराव चवळे, अखिल भारतीय खेत मजूर युनियन भंडाराचे शिवकुमार गणवीर, माधव बांते, अॅड नेहाल सिंग राठोड, अँड जगदीश मेश्राम, बाधित शेतकरी संघर्ष समिती ब्रम्हपुरीचे मुख्य निमंत्रक विनोद झोडगे, मीनाक्षी सेलोकर, प्रभाकर्जी शेंडे, अनिल मेश्राम, तलमले, सुधीर पिलारे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांवर कदापी अन्याय होऊ देणार नाही. जो पर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही. तो पर्यंत अनेक आंदोलने करून आम्ही शेतकऱ्यांच्यापाठीशी राहु असे राजन श्रीसागर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध लढा उभारण्यासाठी, आपल्या हक्क, अधिकारासाठी बाधित शेतकऱ्यांनी संघटित राहून लढा तीव्र करण्याचे या परिषदेत ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन कॉ. विनोद झोडगे मुख्य निमंत्रक समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती यांनी केले. या परिषदेला भंडारा, गडचिरोली, ब्रम्हपुरी या भागातील बाधित शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.