रिसोड (Lakhan Thakur) : रिसोड तालुक्यात नाफेड मध्ये सोयाबीन विक्री करिता ऑनलाईन ओटीपीची अट कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम याना भाजपाचे प्रदेश सचिव लखन ठाकुर (Lakhan Thakur) यानी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करणयात आले की, रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती मधील नाफेड अंतर्गत सोयाबीनची विक्री करण्याकरिता रिसोड तालुक्यातील बहुतांश शेतकरी बांधव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आपल्या सोयाबीनची नोंदणी करण्याकरिता येत आहेत. परंतु त्या ठिकानी असलेले कर्मचारी शेतकरयाणा उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. आम्हाला ओटीपी आल्याशिवाय आपल्या मालाची नोंदणी होणार नाही असे सांगत आहे. त्याशिवाय मार्केट यार्ड मध्ये माल मुळीच आणू नये असे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा माल विकण्याकरिता शेवटची ऑनलाईन करण्याची तारीख रविवार १५ डिसेंबर आहे.
तांत्रिक अडचनी मुले शेतकऱ्यांना ओटीपी न येत असल्या कारणाने बऱ्याच कष्टकरी शेतकऱ्यांचा माल मार्केट यार्डच्या बाहेर पडून आहे. संबंधित नाफेड अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना सोयाबीन विक्रीची तात्काळ नोंदणी होण्याकरिता आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करून ओटीपीची असलेली अट हटविण्याबाबत योग्य ते निर्देश देण्यात यावे.अशी मागनी दिलेल्या निवेदनात लखनसिंह ठाकुर (Lakhan Thakur) यानी केली आहे.