महाराष्ट्राषी गद्यारी करून ठाकरे पवारांच्या पाठीत खंजीर खुपसणा-यांना धडा षिकवा – मुकूल वासनिक
संविधान व लोकषाही वाचविण्यासाठी आंबेडकरी जनतेने राहुलभाउंचे हात बळकट करावे – संदेष आंबेडकर
चिखली (Rahul Bondre) : केंद्र व राज्यातील शेतकरी विरोधी धोरणांमुळे राज्यातील शेतकरी वर्गावर आर्थीक संकट कोसळल्याने मेटाकुटीस आला आहे. तर राज्यातील उद्योग धंदे परराज्यात नेवून महराष्ट्रातील बेरोजगाराची कु-हाड चालविणा-यांच्या भुलथापांना बळी न पडता राज्यातील सत्ता उलटवुन टाकण्यात बुलडाणा जिल्हयाचा सिंहाचा वाटा असालाच हवा, त्याचबरोबर महाराष्ट्राषी गद्यारी गरून उध्दव ठाकरे व शरदचंद्र पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसणा-यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार राहुलभाउं बोंद्रे (Rahul Bondre) यांना प्रचंड मताधिक्य देवुन विधानसीोत पाठवित गद्यारांना धडा षिकवा, असे आवाहन अभाकॉचे महासचिव खासदार मुकुलजी वासिकन यांनी चिखली येथे केले.
तर हिंदु धर्मीय गीतेवर, मुस्लीम धर्मीय कुराणावर चालतो त्याचप्रमाणे भारत देष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधावर चालतो, आणि जाती,धर्म,पंथात विष पेरून भांडने लावणा-या तसेच संविधानाला नष्ट करू पाहणा-या मनुवादयांना संविधान व लोकषाही वाचविण्यासाठी आंबेडकरी जनतेने राज्यातील सरकार उलथुन टाकण्याकरीता राहुलभाउ बोंद्रे यांच्या पंजा या निषाणीला प्रचंड मताधिक्य देवुन बळकटी देण्याये आवाहन अखिल भारतीय बुध्दीष्ट सोसायटी इंडीयाचे चेअरमन संदेष आंबेडकर यांनी केले. चिखली विधानसभा मतदार संघातील उसळलेल्या विराट जनसमुदायाच्या गर्दीच्या साक्षीने कॉग्रेसचे अधिकृत उमेदवार राहुलभाउ बोंद्रे यांनी ऐतिहासीक राजाटॉवर येथील जाहीर सभेनंतर आपला नामाकंन अर्ज दाखल केला. सभास्थळी उसळलेली विषालकाय गर्दी राहुलभाउंच्या विजयावर षिक्का मोर्तब करणारी ठरली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळुच नव्हे तर जमीनही घसरल्याचे चित्र निर्माण झाल्याचे पहावयास मिळत असल्याचे दिसुन आले.
महाविकास आघाडी तथा कॉग्रेसचे उमेदवार राहुलभाउ बोंद्रे (Rahul Bondre) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगी जिल्हयाची राजकीय राजधानी असलेल्या ऐतिहासीक राजाटॉवर येथील व्यासपीठावरून बोलतांना मुकूलजी वासिकन पुढे म्हणाले नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत थेट जनतेतुन प्रचंड मताधिक्य घेवुन नगराध्यक्षपदी विराजमान होत चिखली विधानसभा मतदार संघाच्या राजकारणात षिरकाव करणा-या राहुलभाउ बोंद्रे यांनी आपल्या कार्य पध्दतीचा ठसा जनमानसाच्या मनात उमटवित दोन वेळा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले तर त्यांना दोनवेळा अल्प मताच्या फरकाने पराभावाचा सामानाही करावा लागला. मात्र पराभवाने खचुन न जाता बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटी अध्यक्ष पदाची जबाबदारी यषस्वीपणे पेलत असतांना सर्वसामान्यांच्या प्रष्नांसाठी स्वतःला झोकुन देणारा लढवया व युवकांचे हद्यसम्राट म्हणुन ख्याती प्राप्त करीत वेळप्रसंगी न्याय हक्काच्या लढाईसाठी कारावासही भोगणा-या राहुलभाउंच्या कार्याची दखल घेत कॉग्रेसने त्यांना उमेदवारी बहाल केल्याचे सांगितले.
सुडबुध्दीचे राजकाकरण केल्याने विकास होत नाही – डॉ. राजेंद्र षिंगणे
देषासह राज्यातील सामाजा समाजात विष पेरून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम मोदी व षिंदे-फडणवीस सरकारने गत काळात केल्यामुळे दंगली घडुन आणुन अषातंता व अराजक्ता निर्माण करण्याचं काम केल. मधल्या काळात शेतक-यांच्या जिव्हाळयाची असलेली बुलडाणा जिल्हा केंद्रीय बॅंक आर्थीक दृष्टया डबघाईस आली होती. म्हणुन जिल्हा बॅंक वाचविण्याकरीता मी अजित पवारांच्या सोबत गेलो होतो. परंतु ज्यांनी माजी राजकीय कारकिर्द घडविली त्या शरदचंद्र पवार साहेबांच्या छत्रछायेत आल्याचा मनस्वी आनंद होत आहे. सुडबुध्दीचे राजकारण केल्याने विकास होत नसुन येत्या काळात राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेची परीस्थीती बदलण्याकरीता राहुलभाउंना (Rahul Bondre) प्रचंड मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवा असे आवाहन डॉ. षिंगणे यांनी केले.
हवालदिल शेतकरी व बेरोजगारी नष्ट करण्याकरीता राहुलभांउच्या पाठीषी उभे रहा – रेखाताई खेडेकर
चिखली मतदार संघात अगदी माजी मंत्री भारतभाउ बोंद्रे नंतर सलग तिस-यांदा मला व त्यांनतर दोन वेळा राहुलभाउंना जनतेने विधानसभेत पाठविले. मात्र त्या व आताच्या काळात मतदार संघातील राजकारणात अमुलाग्र बदल झाला आहे. सद्यस्थितीत विकास कामात प्रचंड भ्रष्टाचार पाहवयास मिळत असुन दडपषाही सुरू असतांना भयग्रस्त वातावरणात सर्वसामान्य जतना वावरतांना दिसत आहे. हवालदिल शेतकरी व बेरोजगार तरूणांच्या हाताला काम देण्याकरीता तसेच मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या माध्यमातुन कॉग्रेसने राहुलभाउ बोंद्रेच्या (Rahul Bondre) स्वरूपातुन दिलेल्या उमेदवारीच्या संधीचं सोनं चिखलीतील मायबाप जनतेने करून त्यांच्या पाठीषी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन सोै. रेखाताई खेडेकरांनी केले.
शाह-फडणविस यांनी पक्ष फोडण्याचं पाप केलं – प्रा. नरेंद्र खेडेकर
चिखली मतदार संघातील यापुर्वीच्या लोकप्रतिनीधींच्या कर्तुत्व कार्यप्रणालींचा भुतकाळातील सविस्तर उजळणी करीत हा मतदार संघ कधीच उपद्रवी नव्हता मात्र ‘ताईसाहेब’ यांना मतदार संघातील जनता त्रासली आहे. तर चित्रपट श्रुष्टीतील गाजलेल्या ‘ बाईपन भारी’ या नुसार मतदार संघात ताई पण भारीचा प्रत्यय येत असुन शहा-फडणवीस यांनी षिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचं पाप केल्याच अवघ्या राज्यानं बघीतलं. ऐकीकडे लोकसभेत पराभवामुळे जिव्हाळी लागलेल्या प्रसंगातुन उभारी घेण्याकरीता लाडकी बहीण योजना आणुन बहिणींना 1500 रूपये दयायचे, अणं त्याच लाडक्या बहीच्या चुमूकल्या मुलींवर अत्याचार अन्याय करणा-यांना पाठीषी घालायचे, असंवेधनषिल व नित्कृष्ठ दर्जाच्या कामांची पाठराखन करणा-या भ्रष्टाचारी सरकारला धडा षिकवण्यासाठी राहुलभाउंना पुन्हा विधानसभेत पाठावा असे प्रतिपादन षिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केले.
यावेळी कॉग्रेस पक्षनिरीक्षक संदिप मंगरोला गुजरात, आमदार धिरज लिगांडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेष कॉग्रेसचे सरचिटणीस श्यामभाउ उमाळकर, भाई प्रदिप आंभारे, विष्णु पाटील कुळसुंदर, रिजवान सौदागर, प्रा.निलेष गावंडे, नंदु क-हाडे, गजानन वायाळ, विष्वास खंडागळे आदि मान्यवरांची समयोचित भाषने झाली. तर यावेळी वासिनिकांच्या हस्ते गत निवडणुकीतील वंचित पक्षाचे उमेदवार अषोक सुरडकर यांचा व इतर पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांचा कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेष झाला. यावेळी अॅड. गणेषराव पाटील, बाळासाहेब भोंडे, सौ. ज्योतीताई खेडेकर, संजय राठोड, छगणदादा मेहेत्रे, विðल लोखंडकार, शैलेष सावजी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन प्रख्यात कवी अजिम राही यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीतील सर्वच विभाग,सेल,ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व शेतकरी बांधवाची मोठया संख्येने उपस्थिती होती.
कर्मयोगी पित्याचं छत्र हरविले मात्र जनतेने आर्षिवाद रूपी छत्र दयावे – राहुलभाउ बोंद्रे
केंद्र व राज्यातील भाजपा सरकाने संविधान व लोकषाही अडचणीत आनल्याची उदाहरणे देत मतदार संघातील तब्बल 4 हजार मतदारांची नावे यादीतुन वगळण्याच्या केलेल्या कृतीचे षडयंत्र आपण दिलेल्या लढयातुन उघडे पाडले. विकास कामांच्या नावावर कमिषनच्या स्वरूपातुन प्रचंड भ्रष्टाचार सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी केल्याचे सर्वस्त्रोत आहे. आम्ही उभारलेली गरूडझेप षिक्षण व इतर प्रकल्प त्यांनी बंद पाडलीत, आपल्या आषिर्वादाने विधानसभेत गेलो तर लाडकी बहीण योजना बंद न पडु देता 1500 ऐवजी 2000 रूपये महिना देण्याचे सांगुन मुलींच्या सक्षमीकरणा करीता विविध प्रकल्प राबविणार असल्याचे राहुलभांउनी सांगितले तर गत काळात मला सपु पाहणा-यांच्या विरोधात गावागावातुन मोठया प्रमाणात मला पक्ष प्रवेषाच्या माध्यमातुन समर्थन प्राप्त होत आहे.
गत काळात मला संपविण्याकरीता सत्ताधा-यांकडुन सर्व प्रकारचे आयुधे वापरीत असंख्य अडचणी निर्माण करण्यात आल्या मात्र त्यावर मी आपल्या आषिर्वादामुळे मात करू शकलो. कर्मयोगी स्व. तात्यासाहेब यांनी आपल्या हयातीत संघर्षातुन चिखली मतदार संघात शैक्षणीक क्रांती घडवीत सहकाराची उभारणी केली. त्यांच्याकडुनच सामाजिक, राजकीय, धार्मीक क्षेत्रात कार्य करण्याचा वारसा आपणास लाभला असुन त्यांनी दर्षविलेल्या तत्वावर मी चालत आहे. मात्र पित्याचे छत्र हरवल्या नंतर मला माझा खरा मार्गदर्षक व काळजीवाहु गेल्याची उणिव आज भासत असल्याचे सांगित राहुलभाउंनी पित्याचे छत्र हरविले मात्र मायबाप जनतेने मतदान स्वरूपातुन आर्षिवाद रूपी छत्र प्रदान करण्याचे भावणीक आवाहन यावेळी केले.




