मानोरा(Washim):- सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) वारे वाहू लागले आहेत. येत्या चार नोव्हेंबर रोजी रणांगणचे चित्र स्पष्ट होणार असले तरी नामांकनाच्या भाऊगर्दीने महायुती व महा विकास आघाडी या दोन्ही पक्षाच्या नेते, पुढाऱ्यांची झोप उडाली आहे.
कारंजा – मानोरा विधानसभेत निवडणुकीचे वातावरण तापावयास सुरूवात झाली आहे. नामाकन अर्ज मागे घेण्यास केवळ चार दिवसांचा अवधी राहिलेला आहे. महाविकास आघाडी, महायुती व वंचित बहुजनाच्या उमेदवारासमोर बंडोबारायानी उभे आव्हान ठाकले आहे. विधानसभा क्षेत्रात महायुती व महाविकास आघाडीच्या निर्माण झालेले बंड शमविण्यासाठी बंडोबाची मनधरणी करता करता दमछाक होणार आहे.