गोरेगाव/हिंगोली (Brutal murder case) : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे २० फेबुवारी रोजी घडलेल्या संजना खिल्लारी हिच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ २५ फेब्रुवारी रोजी गावकऱ्यांनी कॅंन्डल फेरी (Candle march) काढुन जलदगती न्यायालयात प्रकरण चालवुन त्या नराधमाला फाशी द्या, अशा तीव्र भावनेने घोषणा देत निषेध नोंदविला आहे. प्रमुख महीला पुरूषांनी घटने बाबत संताप व्यक्त करत तात्काळ न्याय द्या अशा भावना व्यक्त केल्या आहेत प्रसंगी पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले आहे.
गोरेगाव येथे २० फेब्रुवारी रोजी अभिषेक संजय खिल्लारी या नराधमाने संजना गजानन खिल्लारी या (Brutal murder case) तरुणीचा चाकुने वार करत निघृण खुन केला होता या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या (Candle march) घटनेने तीव्र संतापाचे पडसाद गावासह पंचक्रोशीत उमटले. जीवीत हाणीने हळहळ व्यक्त होत आहे. २४ फेब्रुवारी रोजी गावकऱ्यांनी स्थानिक ठाण्याला निवेदनाद्वारे श्रध्दांजली पर कॅंन्डल फेरी काढण्याचे कळविले होते. २५ फेब्रुवारी रोजी मयत संजना खिल्लारी या तरुणीच्या निवासस्थाना पासुन काढण्यात आलेल्या फेरीत महिला,पुरूष, युवक,युवतींचा उस्फुर्त सहभाग होता.
शांततेत फेरी मार्गाने काढण्यात आलेल्या फेरीत नराधमाला फाशी द्या, प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा, मयत संजनाला तात्काळ न्याय द्या अशा तीव्र संतापाच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रीत जमलेल्या सर्वांनी मयत संजना खिल्लारी हिच्या तैलचीत्र प्रतीमेला अभिवादन केले. निषेध सभेत श्रध्दांजली पर बोलतांना डॉ रवींद्र पाटील, गजाननराव कावरखे पाटील,ग्रा.प सदस्य जी. एम खिल्लारी पाटील, गजाननराव खिल्लारी पाटील, विकास खिल्लारी पाटील आदींनी अनपेक्षित घटना घडल्याने दु:ख व्यक्त करत अशा घटना दुसऱ्यांदा घडु नये.
यासाठी दोषीला फाशीच झाली पाहीजे, अशा (Brutal murder case) तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या .महीला सपनाताई बोराळकर, रूपालीताई कावरखे,रूखमीणाताई कावरखे यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. या (Candle march) निषेध सभेत उपसरपंच व्ही. एस. कावरखे, दासराव पाटील, ग्रा.प सदस्य सुनील भिकाजी पाटील, सुनील विनायक खिल्लारी पाटील, डॉ राजेश कावरखे पाटील, दिलीप उर्फ बंडु कावरखे पाटील आदी महिला पुरूष पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी ठाणेदार विनोद झळके,महसुल मंडळाधिकारी साळवी ताई, ग्राम महसुल अधिकारी प्रदीप इंगोले, यांची उपस्थिती होती गावात दुपारपर्यंत उत्स्फूर्त कडकडीत बंद पाळुन घटनेचा निषेध करण्यात आला.