हिंगोली (car accident) : तालुक्यातील गिलोरी पाटीजवळ शनिवारी पहाटेच्या सुमारास भरधाव कार (car accident) रस्त्याखाली उतरून झाडावर आदळल्याने उमरखेड तालुक्यातील खरूस बु. येथील अनिरूद्ध तान्हाजी वानखेडे (२६), अर्चना सुभाष वानखेडे (४०), संतोष कैलास वानखेडे (२५) या तिघांचा मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर (Hingoli hospital) रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यात कार झाडावर आदळली
मिळालेली माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामधील खरूस बु. येथील वानखेडे कुटूंबीय कार क्र. एमएच ०५ डीएस ७४२५ यामधुन छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात औषधोपचारा करिता गेले होते. (Hingoli hospital) रुग्णालयातील काम आटोपल्या नंतर ३ मे रोजी रात्रीच्या सुमारास कारने परत आपल्या गावी जाण्याकरिता निघाले होते. हिंगोली ते नर्सी नामदेव मार्गावर गिलोरी पाटीजवळ ४ मे रोजी पहाटे ४ च्या सुमारास अचानक कार चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली उतरून झाडावर जोरदार (car accident) आदळली. याच वेळी मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी धावून आले.
उमरखेड तालुक्यातील तिनजण ठार; दोघे गंभीर
या घटनेची माहिती मिळताच (Hingoli Police) नर्सी नामदेव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरूण नागरे, जमादार हेमंत दराडे, पांडुरंग डव्हले, प्रभाकर माने, पाचपुते यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्या नंतर अनिरुद्ध तान्हाजी वानखेडे (२६), अर्चना सुभाष वानखेडे (४०) दोघे रा. खरूस बु. ता. उमरखेड यांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. या शिवाय संतोष कैलाश वानखेडे, अनंथा गंगाराम चव्हाण, सुभाष रामराव वानखेडे हे तिघे गंभीर जखमी असल्याने त्यांना तात्काळ नर्सी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.
भिषण अपघात, कारचा चुराडा
नांदेड नजीक पोहचत असताना संतोष कैलास वानखेडे (२५) याचाही मृत्यू झाला. अपघात एवढा भिषण होता की, कारचा चुराडा झाला. अपघातातील अनिरूद्ध वानखेडे व अर्चना वानखेडे या दोघांचे शवविच्छेदन हिंगोलीतील शासकीय रुग्णालयात केल्या नंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटने बाबत सायंकाळी उशिरा पर्यंत नर्सी नामदेव (Hingoli Police) पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.