जगळपूर(Latur):- चाकूर येथील संचालक बाबूराव खलग्रें यांच्यासह ईतर तिघे जन विविध.का.से.सह.सोसायटीच्या कामासाठी कारने छत्रपती संभाजीनगर कडे जात असताना पाचपीर दर्गा नांदगावपाटी अंबाजोगाई जवळ दि.२१सप्टेबर रोजी रात्री ११.३० दरम्यान कार व कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात होऊन कारचा चूराडा झाला. या अपघातामध्ये कारमधील चार जन जागीच ठार झाले आहेत. लातुर जिल्ह्यातील चाकूर बाजार समितीचे संचालकासह जगळपुर खुर्द ता.चाकूर येथील सोसायटीचे गट सचिव यांच्यासह अन्य २ जण विविध कार्यकारी सोसायटीच्या कामानिमित्त स्व:तची एम एच २४ एएस ६३३४ स्विफ्ट कार घेऊन दि.२१ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी नगरकडे निघाले होते.
कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात होऊन कारचा चूराडा
घरापासून ५० किलोमीटर दूर कार पोचली असता मुसळधार पावसाला(Rain) सुरूवात झाली समोरून सुसाट सुटलेला एम एच १२ एम व्ही ७१८८ ट्रक कंटेनर चालकाला पावसामुळे कार दिसली नाही आणि ट्रक या कारवर जोरात आदळली. त्यात चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा जगळपुरचे माजी सरपंच माधवराव खलंग्रे (५७), आत्माराम बाणापुरे , (५४) रा.जगळपुर सौदागर केशव कांबळे (४७) रा.जगळपुर शिवराज डोम (४९)लातुर ४ जण जागीच ठार झाले. यामधील ३ जणांवर जगळपुर येथील स्मशानभूमीत एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले तर शिवराज डोम यांच्यावर लातुर येथे अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. खलंग्रे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली एक मुलगा बाणापुरे यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगी एक मुलगा कांबळे यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.या घटनेमुळे जगळपुर गावांसह चाकूर तालुक्यावर शोककळा पसरली होती.