फाळेगाव (Hingoli):- हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावर अंबाळा फाट्यावर मोटरसायकल व कारचा अपघात(Accident) होऊन मोटर सायकल स्वारजखमी झाल्याची घटना दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान घडली अपघाताची माहिती कळताच अंबाळा येथील पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील मोटर सायकल स्वार गजानन पडघान रा. कनेरगाव नाका तालुका जिल्हा हिंगोली येथील असून जखमीला खाजगी वाहनाद्वारे वाशिम येथील खाजगी रुग्णालयात (Hospital)दाखल करण्यात आल्याची माहिती आंबाळा पोलीस पाटील मुन्ना इंगोले यांनी दिली.