पाथरी (Parbhani):- राज्य महामार्ग क्रमांक ६१ वर हादगाव शिवारात रविवारी रात्री स्विफ्ट कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार तर स्विफ्ट मधील महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान अपघातग्रस्त कार (Accidental car) अज्ञातांनी जाळून टाकल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे .
राज्य महामार्ग ६१ वर हादगाव शिवारात अपघात
पाथरी तालुक्यातुन जाणाऱ्या राज्य महामार्ग(State Highway) क्रमांक ६१ वर हादगाव शिवारामध्ये सोमवार २ जून रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर कडे जाणारी स्विफ्ट कार क्रमांक एमएच २० ईई २६५१ व पाथरीकडे जाणारी विना क्रमांक असणारी दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात (Accident) झाला .झालेल्या अपघातामध्ये दुचाकी वरील युवक महादेव भास्कर पवार वय ३२ रा . पाथरी हा जागीच ठार झाला . यावेळी कार मध्ये दोन महिला व एक पुरुष प्रवास करत असल्याची माहिती असून अपघातात यामधील एक महिला गंभीर जखमी (seriously injured) असल्याची माहिती मिळाली आहे . जखमीला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
अज्ञातानी अपघातील कार जाळली
दरम्यान अपघातात मृत झालेल्या युवकाचे पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन (Autopsy) करण्यात आले आहे .सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास कार चालकावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मयताच्या नातेवाईकांनी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये मोठी गर्दी केली होती .जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार नसल्याचे यावेळी त्यांचे म्हणणे होते .पोलीस निरीक्षक मोहीते यांनी आलेल्या नातेवाईकांशी चर्चा केली . बातमी लिहीत असे पर्यंत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. संध्याकाळी साडेसात वाजता अपघात झाल्यानंतर सदरील कार घटनास्थळी रस्त्याच्या बाजूला उभी होती. परंतु अपघाततील स्विफ्ट कार अज्ञात व्यक्तींनी जाळून टाकल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.