पुसद (Yawatmal):- प्रतिबंधित व अत्यंत स्फोटक समजल्या जाणाऱ्या कार्बाइड स्फोटक (Carbide Explosive) ची विनापरवान की खुलेआमपणे सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन विक्री करणाऱ्या एका 51 पुड्यासह शहर पोलिसांनी दि. दोन नोव्हेंबरच्या सकाळी 11:00 वाजता च्या दरम्यान शहरातील कै. वसंतराव नाईक चौकातून जेरबंद केले.
पुसदमध्ये कार्बाइड स्फोटक विकणारा जेरबंद, 51 पुड्या जप्त
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल किशोर भानुदास खंडार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी पवन सुभाष चव्हाण वय 21 वर्ष रा. व्हीजे एन टी आश्रम स्कूल कान्होळी बारा नागपूर हल्ली मुक्काम मदनी दिंदोडा जिल्हा वर्धा हा नाईक चौक बस स्थानक कडे जाणाऱ्या मार्गावर प्रतिबंधित व अत्यंत स्फोटक असणाऱ्या कार्बाइड स्फोटकासह दोन प्लास्टिक पाईप याच्या माध्यमातून कार्बाइड स्फोटक पदार्थ उडविण्याचा वापर करीत होते. सदर आरोपीकडून 51 पुड्या, एक पुडी 17 ग्राम वजनाची अशा 51 पुड्या, दोन प्लास्टिक पाईप ज्यांची अंदाजे किंमत दोन हजार रुपये, प्रत्येकी प्लास्टिक पाईप ची दोनशे रुपये किंमत, असा एकूण 2750 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुसद शहर पोलीस स्टेशनचे हेड पोलीस कॉन्स्टेबल अतुल दातीर व पोलीस कॉन्स्टेबल(Police Constable) किशोर खंडार हे शहरात पेट्रोलिंग करीत असताना नाईक चौकामध्ये वरील प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने आरोपीला जेरबंद करून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.
सदर आरोपी जवळ कुठलाही अत्यंत स्फोटक असलेला कार्बाइड स्फोटक विक्रीचा अधिकृत परवाना आढळून आला नाही. यावरून सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद शहर ठाणेदार यांच्या सूचनेनुसार हेड पोलीस कॉन्स्टेबल अतुल दातीर व सहकारी करत आहेत.