कारंजा(Washim):- ग्रामीण पोलीस स्टेशन (Police Station) अंतर्गत असलेल्या खानापूर येथे एका 30 वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या(Suicide) केली. ही घटना शुक्रवारी 21 जून रोजी पहाटे 5 वाजता उघडकीस आली. अक्षय सुधाकर कडू असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून, तो खानापूर येथील रहिवासी आहे.
गोठ्याजवळ एका लिंबाच्या झाडाला मृतदेह
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी गावाबाहेर असलेल्या गोठ्याजवळ एका लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह (Dead Body)गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे कुटुंबीयांनी ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रशासकीय सोपस्कार पार पाडत मृतदेह कारंजा उपजिल्हा रुग्णालयात शवाविच्छेदनासाठी आणला. दरम्यान, कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची(sudden death) नोंद घेतली असून, घटनेचा प्रथम तपास विनोद महाकाळ यांनी केला. तर पुढील तपास ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात पप्पूवाले करीत आहेत. दरम्यान, शुक्रवारी दुपारी शोकाकुल वातावरणात खानापूर येथे त्याचे पार्थिवावर अंत्यसंस्कार (funeral)करण्यात आले. अक्षयच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.