कनकपुरा (Karnataka) : लोकसभा निवडणूकच्या (LokSabha Elections) दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी कर्नाटकातील कनकापुरा (Polling Booth) मतदान केंद्रावर ‘वन थीम’ असलेले विशेष मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतदारांचा सहभाग वाढवणे आणि वन संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा त्याचा उद्देश आहे. या विशेष मतदान केंद्राचा उद्देश मतदारांना मतदान करताना नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे. कनकापुरा येथील GTTC मतदान केंद्र क्रमांक 79 वर स्थित, ‘आडवी’ मतदारांना हिरवाईने नटल्यासारखा अनोखा अनुभव देण्यात येत आहे.
मतदानासाठी येणाऱ्या (LokSabha Elections) मतदारांना निवडणूक अधिकारी भेटवस्तू म्हणून रोपांचे वाटप करत आहेत. (Kanakapura Municipality) कनकपुरा नगरपालिकेचे आयुक्त महादेव स्वामी यांनी सांगितले की, कनकपुरा येथे जंगलाच्या थीमवर हे बूथ स्थापन करण्यात आले आहे. कारण हवामानातील बदल ही एक मोठी समस्या आहे. जंगल आणि पाणी वाचवण्यासाठी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections) दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांमधील 88 जागांसाठी आज मतदान झाले आहे. दुपारी मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आज ज्या 88 जागांवर मतदान होत आहे, त्यामध्ये 20 केरळमधील, 14 कर्नाटक, 13 राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 8, मध्य प्रदेशातील 6, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी5, छत्तीसगड आणि प. बंगालमध्ये जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी 3 आणि त्रिपुरातील प्रत्येकी 1 जागा समावेश आहे. या टप्प्यात मतदान होत असलेल्या 88 जागांपैकी भाजपकडे निम्म्याहून अधिक म्हणजे 52 जागा आहेत, तर काँग्रेसकडे 22 जागा आहेत.