माहूर (Mahur Accident) : राष्ट्रीय महामार्गावरील विदर्भ मराठवाडा जोडणार्या धनोडा येथील ब्रिटिश कालीन पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या पुलास स्वसंरक्षण कठडे नसल्याने हा पुल धोक्याचा असल्याचे वृत्त अनेक वर्तमान पत्रातून प्रकाशित केले होते. मात्र गेंड्याची कातडी परीधिन केलेल्या समधित विभागास स्वसंरक्षण कठडे व पुलावरील खडे बुजविण्याचे सौजन्य दाखवले नसल्याने (Mahur Accident) माल वाहतूक करणारा ट्रक थेट नदी पात्रात कोसळल्याची घटना दि.२८ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
के टी सी कंपनीचा मालवाहू ट्रक चंद्रपूर येथुन सिमेंट भरलेला ट्रक हा धनोडा येथील पुलावरुन विदर्भात जात असताना पुलास पडलेल्या खड्यात अपटुन चालकाचे गाडीवरील नियंत्रण बिघडल्याने व पुलास स्वसंरक्षण कठडे नसल्याने तो मालवाहू ट्रक थेट पैनगंगा नदी पात्रात जवळपास ५० ते ६० फूट खोल नदी पात्रात पडल्याने ट्रकचा चकनाचुर झाला ट्रक नदीपात्रात पडल्याचा आवाज झाल्याने तेथील स्थानिक नागरीकांनी घटनास्थळाकडे धाव घेत चालकास बाहेर काढीत अपघात गंभीर दुखापत झालेल्या चालकास माहुर येथिल (Mahur Accident) ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले तेथे वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत.