मानोरा (Manora Bazar Samiti) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी आपला कृषी माल दि. १५ मे रोजी विक्रीसाठी आणले असता शेतमाल अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे तूर पिक वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेले व शेतमाल भरून असलेले पोतेही भिजले आहे. (Manora Bazar Samiti) शासनाने शेतकऱ्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देत नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
सविस्तर असे की, पाऊस, ऊन, वादळी वारा, थंडी व वन्य प्राण्याची भिती न बाळगता शेतात रात्रंदिवस कष्ट व जागल करून उधार उसने करत शेतकरी काळया मातीत राबून शेती करतात. कृषी माल बाजारात विक्रीसाठी आणतात तेंव्हा भाव पडतात. तरीही शेतीशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी अपार मेहनत करून शेती कसतात. शेतकरी हिताची असलेल्या (Manora Bazar Samiti) बाजार समितीत त्यांच्या मालाला जागा नसल्याने उघड्यावर माल ठेवावा लागतो.
नेहमीप्रमाणे गुरुवारी शेतकऱ्यांनी बाजार समितीत शेतमाल तूर, गहू, सोयाबीन, भुईमूग, बाजरी, ज्वारी आदी पिके विक्रीसाठी आणली असता आलेल्या अवकाळी पावसाने शेतमाल पाण्यात वाहून गेला. (Manora Bazar Samiti) बाजार समितीच्या नियोजन शून्य कारभारामुळे बाजार समितीच्या प्रांगणात खुल्या जागेत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी ठेवलेले शेतमाल पाण्यात वाहून गेले असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.