देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Tumsar Gram Panchayats: सव्वा पाच महिने झाले तरी 15 व्या वित्त आयोगाचा निधी नाही!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भभंडाराराजकारण

Tumsar Gram Panchayats: सव्वा पाच महिने झाले तरी 15 व्या वित्त आयोगाचा निधी नाही!

admin1
Last updated: 2025/09/29 at 2:09 PM
By admin1 Published September 29, 2025
Share
Tumsar Gram Panchayats

विकासाचा गाडा खिळला, ‘तुमसरच्या’ ग्रामपंचायती उपाशी!

राहुल भवसागर
हरदोली/सिहोरा (Tumsar Gram Panchayats) : झालं! गावकर्‍यांच्या नशिबी विकासाचा नारळ फुटण्याऐवजी, सहा महिन्यांपासून ‘बोंब’ आली आहे. पंधरावा वित्त आयोगाचा एक रुपया अजूनही तुमसर तालुक्यातील एकाही (Tumsar Gram Panchayats) ग्रामपंचायतीच्या तिजोरीत पडलेला नाही. येथे गावभर धूळ-माती, गटारी तुंबलेल्या आणि दिवाबत्ती बंद, आणि तिकडं तुमसर पंचायत समितीचेही तेच हाल!

सारांश
विकासाचा गाडा खिळला, ‘तुमसरच्या’ ग्रामपंचायती उपाशी!‘निधी कुठं अडकला साहेब?सरपंचांचे हाल, ग्रामस्थांचा रोष!शासन लक्ष देणार की फक्त बघ्याची भूमिका घेणार?

ऐन दिवाळी तोंडावर आली आहे. घरात लक्ष्मीपूजन होतंय, पण गावात विकासाची कामं ‘राम भरोसे’ आहेत. अधिकारी आणि बाबू लोकांच्या टेबलावर ग्रामपंचायतींच्या फाईली धूळ खात पडल्यात, पण साहेबांना पर्वाच नाही! अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.

‘निधी कुठं अडकला साहेब?

ग्रामपंचायती (Tumsar Gram Panchayats) म्हणजे गावाचा आत्मा! या आत्म्याला जगवायला लागणारा निधी गेल्या सहा महिन्यांपासून अडकून पडलाय. गावातली हातातील कामं थांबली, नवीन कामाचं नाव काढायलाही सरपंच घाबरतोय. रस्त्याला खड्डे पडलेत, डागडुजीला पैसा नाही. नळ योजना बंद पडल्यात, दुरुस्तीला निधी नाही. दिवाबत्तीचे खांब शोभेचे झालेत, दिवे लागत नाहीत. गावातला माणूस विचारतोय, ‘साहेब लोकं झोपून आहेत काय? केंद्रातून निधी आलाय म्हणे, मग तो जिल्ह्याच्या तिजोरीत ‘सडत’ का पडलाय? लालफितीचा हा असा जाच असेल, तर लोकांनी करायचं काय?’

सरपंचांचे हाल, ग्रामस्थांचा रोष!

ग्रामपंचायतीचे सरपंच (Tumsar Gram Panchayats) आणि सदस्य या निधीसाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या दारात दिवस-रात्र चकरा मारून थकून गेलेत. पण तिथं फक्त उडवाउडवीची उत्तरं मिळतात. ‘होईल, होईल!’ म्हणता म्हणता पाच महिने ढकलले. आता दिवाळी आली आहे. गावकर्‍यांचे रोजचे टोमणे, शिव्या ऐकायची पाळी सरपंचांवर आली आहे. ‘तुमचं शासन काय कामाचं? दिवाळीला पण गावात अंधार ठेवायचा काय?’ असं थेट विचारलं जातंय. ‘निवडणुकीच्या वेळेस हात जोडून मतांसाठी दारात येणारे लोकं, आता निधीसाठी तोंड दाबून बसलेत. नुसतं ‘ई-ग्रामस्वराज’ आणि ‘डिजिटल’ चे बोलतात, पण निधी मिळवायला ‘डिजिटल’ चपला झिजव्या वा लागतात.

शासन लक्ष देणार की फक्त बघ्याची भूमिका घेणार?

हा निधी वेळेवर न मिळाल्यास, ग्रामविकास योजनांचा गाडा पूर्णपणे रुतणार आहे. गरीब आणि सामान्य माणूस सुविधांपासून वंचित राहणार आहे. आता शासनाने आपली लालफितीची झोप सोडून द्यावी आणि तातडीने या थकीत निधीचे वितरण करावे. ज्या अधिकार्‍यांमुळे किंवा कर्मचार्‍यांमुळे हा निधी अडकला असेल, त्यांच्यावर ‘कारवाईचा बडगा’ उगारण्याची गरज आहे.

You Might Also Like

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

World Soil Day Special: जागतिक मृदा दिन विशेष: श्रेढर-कुट्टी तंत्रातून मृदा आरोग्य संवर्धन व शाश्वत कपाशी शेतीचा नवा मार्ग- डॉ. आर. एल. काळे

TAGGED: Gram Panchayats, Tumsar, Tumsar Gram Panchayats
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Cyber Crime: ऑनलाईन खरेदीवर सायबर भामट्यांचा डोळा…!

admin1 admin1 October 15, 2024
Bangladesh Protests: बांगलादेशाचे विभाजन करून स्वतंत्र हिंदू देश द्या: सुरेश चव्हाणके
Illegal sand mining: अवैध वाळू उत्खनन: दोन ट्रॅक्टर, जेसीबीसह तब्बल 39 लाखांचा मुद्देमाल जप्त
Parbhanit Finance Company: परभणीत फायनान्स कंपनीच्या कर्मचार्‍याने केली अडिच लाखाची फसवणूक..!
Tiger Attack: इंजेवारी-देऊळगाव परिसरातील नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Teacher AI Training
विदर्भअमरावतीतंत्रज्ञान

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

December 5, 2025
Vitholi Protection Wall
विदर्भवाशिम

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

December 5, 2025
MP Sanjay Deshmukh
विदर्भराजकारणवाशिम

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

December 5, 2025
Man suicide Case
विदर्भगडचिरोली

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?