परभणी शहरातील नानलपेठ पोलीसात नोंद
परभणी (Ramgiri Maharaj) : मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर, हजरत आयशा, मुस्लिम धर्म गुरु, मुस्लिम समाजाबद्दल अपमानकारक वक्तव्य करत दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याने रामगिरी महराज (Ramgiri Maharaj) यांच्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात २० ऑगस्ट रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी सदर गुन्हा पोलीस स्टेशन एमआयडीसी ता. सिन्नर, जि. नाशिक येथे पाठविण्यात आला आहे.
शेख मोहम्मद आसेफ यांनी तक्रार दिली आहे. १५ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या नंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परभणी येथील नानलपेठ पोलीस ठाण्यातही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी फिर्याद नोंद झाल्यानंतर पुढील तपासासाठी गुन्हा नाशिक पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे.