मुंबई (Mumbai) : सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपी विकास आणि सागरसह बंदूक पुरवणाऱ्या पंजाबमधील दोघांना अटक केली आहे. या आरोपींनी अभिनेत्याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना शस्त्रे पुरविली होती.
माहितीनुसार, सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापन नावाच्या दोघांनी शूटर सागर आणि विकासला बंदूक पुरवल्याचा (Mumbai Crime Branch) क्राइम ब्रँचने मोठा खुलासा केला आहे. (Salman Khan) सलमान खानच्या घरावर गोळीबाराची योजना होती. दोघे बिष्णोई टोळीच्या संपर्कात होते. त्यांना अटक केल्यानंतर पोलीस गोळीबार प्रकरणातील त्यांची भूमिका तपासत आहेत. याशिवाय (NSI firing case) एनएसआय गोळीबार प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपी सागर आणि विकास यांच्या कोठडीतही 29 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
याआधी बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई यानेही (Salman Khan) सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेत फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. सलमान खानच्या घरातही भीतीचे वातावरण होते. पण त्यानंतर लगेचच (Salman Khan) सलमान खानच्या पोस्टने चाहत्यांना दिलासा दिला होता.